Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: लसणाच्या भावातील नरमाई कायम; गहू, केळी, कापूस तसेच काय आहेत सोयाबीनचे भाव

Daily Commodity Rates: आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमध्ये आपण सोयाबीन, कापूस, गहू, लसूण आणि केळीच्या बाजारातील महत्वाच्या चढ-उतारांचा आढावा घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी या बाजारातील बदल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin:

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरु आहेत. आज सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १०.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे कमी होऊन २९४ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशात सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहे. देशात आजही सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजारांचा भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव आजही ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढत आहे. सोयाबीनवरील दबाव कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाचे भाव स्थिर

कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता. सीसीआयची खरेदी वाढत असली तरी त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही. तसेच पुढे कापूस आणि सुताला उठाव नसल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आहे. खुल्या बाजारात सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही भावावरील दबाव कायम आहे. देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगली राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाचे दरात चढ उतार

देशातील बाजारात गव्हाच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्याने दरावर परिणाम दिसत आहे. गव्हाचा भाव देशभरात सरासरी २ हजार ८०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान होता पोचला. गव्हाची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर भाव कमी होतील. पण चांगल्या मालाचे भाव हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता धुसर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावी लागेल. तसेच बाजारातील पाईपलाईनही रिकामी आहे. म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर मागणीही चांगली राहील. याचाच आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो.

लसणामध्ये नरमाई

देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. लसणाला उठावही चांगला आहे. मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढ उतार दिसून येत आहेत. लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे आणखी २ ते ३ हजाराने कमी झाले आहेत. सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

केळीचे दर टिकून

केळीच्या भावात मागील तीन आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली. केळीला कुंभ मेळ्यानिमित्त उठाव चांगला आहे. यामुळे केळी दरात सतत वाढ झाली. तर बदलते वातावरण आणि नुकसान यामुळे केळीची आवक कमीच आहे. देशभरात सध्या राज्यातील केळीला उठाव दिसत आहे. त्यामुळे राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली. दोन आठवड्यांपासून केळीचा बाजारभाव सध्या १६०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. केळीच्या आवकेत पुढील महिनाभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचाही परिणाम दरावर दिसेल, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT