Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : आल्याचा बाजारभाव स्थिर ; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत पेरू दर

Commodity Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, पेरू आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमधील सुधारणा कायम

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे. आज दुपारपर्यंत सोयाबीन बाजार कालच्या तुलनेत सुधारला होता. दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव ९.८५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. सोयातेल आणि सोयापेंडचा भाव मात्र स्थिर होता. सोयातेलाचा बाजार ४०.७५ सेंट प्रतिपाऊंवर होता. सोयापेंडचा भाव ३१० डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातही सोयाबीनचा भाव काहीसा सुधारला. प्रक्रिया प्लांट्सचा खरेदीचा भाव ४५०० ते ४६०० रुपयांच्या दरम्यान खरेदी सुरु होती. तर बाजार समित्यांमध्ये भाव सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसामध्ये चढ उतार

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली. तर देशात कापूस स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत कापूस ६९. ७८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे कमी होऊन ५७ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर कायम होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम दिसली. बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारात पुढच्या काळात सुधारणेचे संकेत दिसत आहेत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

पेरुची आवक कमीच

बाजारात पेरुची आवक कमी झाली. राज्याच्या महत्वाच्या पेरू उत्पादक भागांमध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे पेरु आवकेवर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे पेरुला उठाव चांगला मिळत आहे. त्यामुळे पेरुला सध्या सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. पेरुचा बाजार आणखी काही आठवडे कायम राहू शकतो, असा अंदाज पेरु व्यापारी व्यक्त करत आहेत.  

आल्यातील चढ उतार कायम

आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.   

हरभऱ्यातील तेजी कायम 

हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे. पण मागणी कायम आहे. इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत. याचा आधार हरभऱ्याला मिळत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर हरभऱ्याला उठाव मिळत आहे. परिणामी हरभरा भाव प्रतिक्विंटल ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे. सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महीने आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT