Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: काकडीचे बाजारभाव स्थिर; बेदाणे, कांदे, कापूस आणि सोयाबीनचे भाव काय आहेत?

Daily Commodity Rates: आज आपण बेदाणा, कांदा, काकडी, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

बेदाणा तेजीतच

बेदाणा दरातील तेजी मागील दोन महिन्यांपासून टिकून दिसत आहे. लग्नसराई आणि सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे. पण दुसरीकडे बेदणा पुरवठा मर्यादीत दिसत आहे. यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्षटंचाई भासली होती. त्यामुळे बेदाणा निर्मिती संथगतीने सुरू होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर टिकू आहेत. नव्या बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २५० रुपये दर मिळत आहे. त्यातच देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज बेदणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.      

कांद्याचा भाव दबावातच

बाजारातील वाढत्या आवकेमुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये आवक चांगली सुरु आहे. त्यामुळे सध्या काद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी १ हजार ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावर दबाव दिसू शकतो. मात्र बाजारातील आवक कमी होत गेल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

काकडीचा बाजार टिकून

सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे. दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरु आहे. मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या १ हजार १०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील. त्यानंतर आवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सोयाबीन दबावातच

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युध्दामुळे सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार दिसत आहेत. मागील आठवड्यात डाॅलरची मूल्य कमी झाल्यानंतर सोयाबीनचे भाव वाढले होते. आज सोयाबीनचे वायदे १०.४० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयातेलालाही चांगला आधार मिळाला. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव वाढले आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारात सोयाबीन ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार तात्पुरत्या घडामोडींमुळे सुरु आहे. मात्र सोयाबीनच्या भावात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही, असे अभ्यासकांनी सांगितले. 

कापूस दर टिकून

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार सुरु आहेत. कापूस पुन्हा एकदा ६७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोचला. देशातील बाजारातही कापसाची आवक कमी आहे. त्यामुळे दराला चांगला आधार आहे. देशातील बाजारात कापसाची आवक ४० हजार गाठींच्या दरम्यान पोचली. तर बाजारभाव ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाची बाजारातील आवक आणखी कमी होत जाणार आहे. भारताची आयात वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही दराला आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसातील दरवाढ कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT