Edible Oil
Edible Oil Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Market : खाद्यतेलाचे दर नरमल्याचा सोयाबीनवर परिणाम

Anil Jadhao 

१) सोयाबीन दर स्थिरावले (Soybean Rate)

देशातील बाजारात आज सोयाबीनचे दर स्थिरावले होते. सलग तीन दिवस थोडी वाढ झाल्यनंतर बाजार आज स्थिर राहीला. आज देशातील बाजारात सोयाबीन ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपये दर मिळाला.

सीबाॅटवरील सोयाबीन वायदे दुपारपर्यंत १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या (Soya Meal) वायद्यांमध्ये पुन्हा वाढ होऊन ४९५ डाॅलरचा टप्पा गाठला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातील सोयाबीन बाजारातही सुधारणा होण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दरातील चढ उतार सुरुच (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापूस दरात चढ उतार सुरु होते. प्रत्यक्ष खेरदीत कापसाचे दर तेजीतच आहेत. काॅटलूक ए इंडेक्स १००.७५ सेंट प्रतिपाऊंडवर होता. तर वायदे ८४.८० सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजारातील दरही दर स्थिर होते.

आजही कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजरात कापसाला मागणी आहे. भारतातूनही निर्यात सुरु झाली. त्यामुळे कापसाचे दर वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) खरबुजाला चांगला उठाव

राज्यातील बाजारात खरबुजाची आवक वाढत आहे. सध्या दिवसा उन्हाचा चटका वाढल्याने खरबुजाला मागणीही चांगली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर आदी मोठ्या बाजारांमध्ये खरबुजाची आवक काहीशी जास्त दिसत असली तरी इतर बाजारांमधील आवक कमी आहे.

त्यामुळे सध्या खरबुजाला प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. खरबुजाचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

४) गहू दरातील तेजी कायम

केंद्र सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली. मात्र तरीही गव्हाचे दर तेजीतच आहेत. गव्हाचे दर सध्या २ हजार ७०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

चालू हंगामात पेरा जास्त झाला तरी उत्पादन किती वाढेल, याबाबत अद्यापही ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे नवा गहू बाजारात येईपर्यंत गव्हाची दरवाढ कायम राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगांनी व्यक्त केला.

५) पामतेलाचे दर काय आहेत?

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर कमी झाले आहेत. जगातील सर्वात मोठा पामतेल उत्पादक इंडोनेशिया पामतेलाचे दर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. इंडोनेशियाने जैव इंधनात पामतेलाचा वापर वाढवला. तर निर्यात कोट्यातही बदल केला.

मात्र तरही पामतेलाचे दर ३ हजार ८०० रिंगीट प्रतिटनाच्या दरम्यान आहेत. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. सध्या पामतेल स्वस्त झाले. त्यामुळे पामतेल आणि सोयाबीन तेलाच्या दरातील तफावत कमी झाली, असे अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने स्पष्ट केले.

तसेच रशिया आणि युक्रेन सूर्यफुल तेलाचा साठा कमी करण्यासाठी सवलत देत आहेत. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल आणि सूर्यफुल तेलाचे दर कमी झाले. सध्या खाद्यतेल बाजार दबावात आहे. मात्र यंदा अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटणार आहे.

त्यामुळं सोयातेल उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं सोयातेलाचा बाजार टिकून आहे. तसेच यंदा जागतिक तेलबिया पेंड उत्पादनही कमी राहील, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला.

तसेच सध्या सोयापेंडला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे सोयापेंडचे दर तेजीतच राहू शकतात. याचा आधार देशातील सोयाबीन बाजाराला मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT