Cotton Rate  Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton Rate: बाजारात सरकीचे दर किती वाढले ?

सरकीला पेंड आणि खाद्यतेलाच्या दरवाढीचा लाभ सरकीला मिळाला. त्यामुळे सरकीच्या दरात जास्त वाढ झाली. बुधवारी देशात सरकीचा सरासरी दर ३ हजार २०० ते ३ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता.

टीम ॲग्रोवन

सोयाबीनमधील सुधारणा कायम

1. देशातील बाजारात सोयाबीन दरातील (Soybean Rate) सुधारणा कायम आहे. चीनची वाढलेली मागणी, पामतेलातील (Palm Oil) तेजी आणि सुर्यफुल तेल (Sunflower Oil) उपलब्धतेतील अडचणी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सुधारले आहेत. त्यामुळे देशातही सोयाबीनच्या दरात वाढ झाली. आज देशातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा सरासरी कमाल दर ५ हजार ३०० रुपयांपर्यंत पोचला होता. तर काही बाजारांमध्ये दराने ५ हजार ४०० रुपयांचा टप्पा गाठला होता. सोयाबीनचे दर वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. 

 मक्याचे दर दबावात

2. देशातील बाजारात सध्या मक्याचे दर काहीसे दबावात आले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात मका दरात सुधारणा पाहायला मिळाली. युक्रेनमधून होणारी धान्य निर्यात पुन्हा बंद झाल्याने मका दराला आधार मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे व्यवहार ६८० डाॅलर प्रतिटनांवर पोचले. तर देशात सध्या नवा मका बाजारात येतोय. त्यामुळं दर दबावात आहेत. सध्या मक्याला देशात प्रतिक्विंटल १ हजार ८०० ते २ हजार १०० रुपये दर मिळतोय. ऐन आवकेच्या हंगामातही मका २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. 

 तुरीचा पुरवठा घटला

3. देशात सध्या तुरीची टंचाई जाणवतेय. त्यामुळं तुरीच्या दरात तेजी आलीये. सध्या देशात तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र सध्या शेतकऱ्यांकडे तूर नाही. नवी तूर डिसेंबरपासून बाजारात येण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत आयात आणि उपलब्ध साठ्यावरच गरज भागवावी लागेल. त्यातच यंदा तुरीचं उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय. 

ढोबळी मिरची तेजीत

4. ऑक्टोबर  महिन्यात झालेल्या पावसानं भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यामुळं सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी होऊन दरात वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीची आवकही बाजारात सध्या घटली. पुणे आणि मुंबई बाजार समित्या वगळता इतर बाजारातील आवक सरासरी ३० क्विंटलपेक्षा कमीच आहे. त्यामुळं ढोबळ्या मिरचीचे दर प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशात तेलबिया पेंडेच्या दरात सुधारणा

5. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबिया पेंडेच्या दरात सुधारणा झाली. तसेच देशातही सोयापेंडेचे दर वाढले. त्याचा आधार सरकीपेंडेलाही मिळतोय. देशातील बाजारात सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सरकीपेंडेच्या दराने मार्च २०२१ नंतरची सर्वात खालची पातळी गाठली होती. १ सप्टेंबरला सरकीपेंडेचा भाव २ हजार २३७ रुपये प्रतिक्विंटलवर होता. मात्र त्यानंतर त्यात काहीशी सुधारणा होत गेली. ३ नोव्हेंबरला सरकीपेंड २ हजार ५६२ रुपयाने विकली गेली. त्यात पुन्हा वाढ होऊन दरानं आता २ हजार ६३९ रुपयांचा टप्पा गाठलाय. सरकी पेंडेच्या दरात सुधारणा झाल्याने सरकीचेही दर वाढले.

सरकीला पेंड आणि खाद्यतेलाच्या दरवाढीचा  लाभ सरकीला मिळाला. त्यामुळे सरकीच्या दरात जास्त वाढ झाली. बुधवारी देशात सरकीचा सरासरी दर ३ हजार २०० ते ३ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता. तो आता ३ हजार ७०० ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान पोचला. तेलबिया पेंडेचे दर वाढल्यानंतर पशुखाद्य बाजारातून सरकी पेंडेला उठाव मिळतोय. त्यामुळं सरकीचे दर वाढत आहेत. याचा फायदा कापूस बाजारालाही होत आहे. कापूस दर सुधारण्याला सरकी दरातील वाढही कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. पुढील काळातही सरकीचे दर तेजीत राहू शकतात. त्यामुळे याचा कापूस बाजाराला आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.   

Paus Andaj: पाच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज; पुढील ५ दिवस काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता

Uddhav Thackeray: ...तर शेतकऱ्यांनी जूनपर्यंत कर्जाचे हप्ते भरायचे की नाहीत?; उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

Spice Farming: मसाला पीक क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत

Forest Department : मंजूर आराखड्यांचा वन विभागाच्या नियोजनात समावेश करा

Rabi Crop Sowing : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी; अवकाळी पावसामुळे पेरणी रखडली

SCROLL FOR NEXT