tur rate agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Rate : तुरीचा भाव कधीपर्यंत तेजीत राहणार?

देशात सध्या तुरीचे दर स्थिरावले. वाढलेल्या दरात तुरीला उठाव मिळत नसल्याने तुरीचे दर एका भावपातळीवर आहेत. पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून महिन्याला एक लाख टन तूर आयात होण्याची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

सणांमुळे हरभरा दर सुधारण्याची शक्यता

देशातील बाजारांमध्ये हरभरा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात हरभरा दर सतत दबावात राहिले. हरभरा दराने यंदा हमीभावाचा टप्पाही गाठलेला नाही. सणांच्या काळात हरभऱ्याला मागणी वाढून दरात सुधारणा होऊ शकते. मात्र हरभरा दरातील ही तेजी मर्यादीत राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. सध्या हरभरा दर प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांदरम्यान आहेत. सणांच्या काळात हाच दर २०० ते ३०० रुपयाने सुधारु शकतात, असा अंदाज व्यक्त होतोय.

मेथी पुढील महिन्यातही भाव खाणार

पालेभाज्यांमध्ये मेथीला मोठी मागणी असते. सध्या मेथीला चांगला दर मिळतोय. मात्र पावसामुळं पिकाचं मोठ नुकसान झालं. त्यामुळं बाजारात आवक घटलीये. श्रावणामध्ये मेथीला मागणी वाढलेली आहे. परिणामी दरात मोठी वाढ पाहायला मिळतेय. मात्र आवक कमी असल्यानं श्रावण संपला तरी मेथीच्या भाजीचे बाजारभाव टिकून राहण्याची शक्यता व्यक्त होतेय. सध्या मेथीला १८ ते २२ रुपये प्रतिजुडीचा दर मिळतोय. सप्टेंबर महिन्यातही आवक कमी राहून मेथीचा दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

उडदाचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज

उडदाचे दर हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागील आठवड्यात उडदाचे दर स्थिरावले होते. त्यातच बर्मा या देशातून आयात होणारा उडीद काहीसा स्वस्त पडत असला तरी प्रक्रिया उद्योगांकडून उठाव मिळतोय. त्यामुळं देशातील दर सध्या स्थिर आहेत. सध्या उडदाला ६ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळतोय. चालू खरिपातील नवीन उडदाची आवक पुढील महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. नवीन मालात ओलावा अधिक असतो. त्यामुळं दर काहीसा कमी होतो. मात्र यंदा मागील हंगामातील उडदाचा साठा कमी असल्यानं या उडदालाही सध्या असलेला दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

सणासुदीत गहू आणखी महाग होणार

देशात गव्हाचे दर वाढतच आहेत. गेल्या आठवडाभरात गहू दर क्विंटलमागे सरासरी १०० रुपयाने वाढले. गव्हाचा दरासरी भाव सध्या २५५० रुपये ते २६०० रुपयांवर पोचलाय. आज मध्य प्रदेशात गव्हाला प्रतिक्विंटल २५५० रुपये दर मिळाला. तर राजस्थानमध्ये २६०० रुपयाने गव्हाचे व्यवहार झाले. गव्हाचे वाढते दर बघता सरकार आयातीला परवानगी देईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत, गहू आयात करण्याची गरज नाही, असं सरकारनं नुकतंच स्पष्ट केलं. पण सरकाच्या या स्पष्टीकरणानंतर गव्हाचे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त होतोय.

तुरीचा भाव कधीपर्यंत तेजीत राहणार?

देशातील बाजारपेठांमध्ये सध्या तुरीचे दर (Tur Rate) स्थिरावले आहेत. वाढलेल्या दरात तुरीचा उठाव (Tur Market) कमी राहिला. तसंच डाळीलाही मागणी घटली होती. त्यामुळं तुरीचे दर (Tur Rate) एका भावपातळीवर स्थिर आहेत. मागील आठवड्यात स्टाॅकिस्टनी नफावसुली सुरु केली. परिणामी तुरीची विक्री (Tur Sale) वाढली. त्यामुळं तुरीचे दर स्थिरावले होते. मात्र देशातील तुरीचा साठा (Tur Stock) बघता नवीन माल बाजारात येईपर्यंत हा साठा पुरणार नाही. सध्याची विक्रीही कमीच आहे. देशातील नवीन तूर (Tur) डिसेंबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत उपलब्ध साठ्यावरच बाजाराची भीस्त असेल.

भारताला बर्मा या देशाकडून तुरीचा पुरवठा होतोय. मात्र त्याचं प्रमाण कमी आहे. येथील व्यापारीही नफावसुलीसाठी तूर बाहेर काढत आहेत. त्यामुळं बर्माची तूरही काहीशी स्वस्त झाली. मात्र याचा देशातील दरावर परिणाम जाणवत नाही. पुढील काळातही आफ्रिकेतील देशांमधून महिन्याला एक लाख टनांच्या दरम्यान तूर आयात होऊ शकते. मात्र देशातील मागणी ही महिन्याला जवळपास साडेतीन लाख टनांच्या दरम्यान असते. त्यामुळं या आयातीचाही दरावर जास्त परिणाम होणार नाही, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारांमध्ये सध्या तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. लातूर बाजारात सरासरी ७ हजार ७०० रुपये, अकोला बाजारात ७ हजार ५०० तर वाशीम बाजारात तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ६०० रुपये दर मिळतोय. बाजारात आवक वाढत नाही तोपर्यंत हा दर टिकून राहील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT