Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा दरात चढ उतार; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच कांदा दर काय आहे?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्येही शुक्रवारी काहीशी वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे ११.६५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३३२ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढ उतार सुरु होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी कापसाच्या वायद्यात नरमाई दिसून आली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७१.०९ सेंटवर होते. देशातील वायदेही ५८ हजार १०० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली.कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

राज्यात लसणाचे भाव तेजीत आहेत. बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे. सरासरीपेक्षा आवक जवळपास ३० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे. पण दुसरीकडे लसणाची मागणी टिकून आहे. त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासूनच तेजीत आहेत. सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढ उतार पाहायला मिळाले. पण बाजारातील कांद्याची आवक कमीच आहे. त्यामुळे सध्या कांद्याचा सरासरी भाव २३०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. यंदा देशातील कांदा उत्पादन घटले. त्यामुळे चांळीत कांदा कमी आहे. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT