Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : तुरीच्या भावात मागील तीन दिवसांपासून पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा १० हजारांच्या दरम्यान आला. तर राज्यातीलल लातूर, अकोला, अमरावती, नागपूर या महत्वाच्या बाजारांमध्ये तुरीचा सरासरी भाव १० हजार ते १० हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होता.

तर देशभरातील बाजारातली सरासरी भाव ९ हजार ५०० ते १० हजार रुपये होता. बाजारातील आवक घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढ उतार कायम आहेत. तर कापसाचे वायदे काही आठवड्यानंतर पुन्हा एकदा ८८ सेंटवर पोचले आहेत. त्याचा परिणाम देशातील वायद्यांवरही दिसून आला असून भावपातळी ६१ हजार ८०० रुपये प्रतिखंडीवर आले.

तर बाजार समित्यांमधील भावपातळीत काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. बाजार समित्यांमध्ये आज कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मंदीतच आहेत. सोयाबीनची आवकही सरासारीच्या तुलनेत चांगली दिसत आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. तरीही सोयाबीन ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव नरमले होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. हरभऱ्याचा भाव मागील दीड महिन्यात क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांनी कमी झाला होता. पण आता काहीशी सुधारणा झाली. हरभऱ्याचा भाव सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

हरभऱ्याचे उत्पादन यंदा घटले. मात्र पिवळ्या वाटाण्याची आयात, सरकारची स्वस्त विक्री आणि नव्या मालाची आवक, यामुळे भावावर दबाव आहे. हरभऱ्याच्या भावात पुढील महीना दीड महिना १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासाकांनी व्यक्त केला. 

दुष्काळामुळे घटलेले उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा होती. मात्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून भाव पाडले आहेत. बाजारात आता उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे.

पण आवकेचा दबाव तेवढ्या प्रमाणात नाह. पण सरकाच्या धोरणामुळे सध्या भाव १२०० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT