Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापसातील सुधारणा टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत तूरीचे दर?

Agriculture Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये काहीशी वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी काहीशी सुधारणा झाली होती. सोमवारी दुपारपर्यंत सोयाबीन शुक्रवारच्या तुलनेत सुधारले होते. दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव ९.७० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. सोयातेल आणि सोयापेंडचा भाव मात्र स्थिर होता. सोयातेलाचा बाजार ४०.७१ सेंट प्रतिपाऊंवर होता. सोयापेंडचा भाव ३०४ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशात सोयाबीन भाव स्थिर होता. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचा भाव ५० रुपयांनी वाढवला होता. ४५०० ते ४५५० रुपयांच्या दरम्यान खरेदी सुरु होती. तर बाजार समित्यांमध्ये भाव सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसामध्ये सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. कापसाला उठाव मिळत असल्याने दराला काहीसा आधार मिळाल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे आजही ७० सेंटच्या पुढे टिकून आहेत. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७१.११ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार १०० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम दिसली. बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारात पुढच्या काळात सुधारणेचे संकेत दिसत आहेत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याचे भाव काहीसे सुधारले

कांदा बाजारात सध्या काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. बाजारात गेल्या तीन आठवड्यांपासून दरात १०० ते २०० रुपयांपर्यंतचे चढ उतार दिसून येत आहेत. तर बाजारातील कांद्याची आवक मर्यादीतच आहे. त्यातच नाफेड स्टाॅकमधील कांदा विकणार असल्याची चर्चा आहे. त्याचाही बाजारावर काहीसा परिणाम दिसत आहे. कांद्याला आज बाजारात ३ हजार ते ३ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीमध्ये काहीशी नरमाई

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लसणाच्या दरात सुधारणा

राज्यात लसणाचे भाव पुन्हा काहीसे सुधारले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्यातच सणांच्या पार्श्वभुमीवर लसणाला चांगला उठव दिसत आहे. पण बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे लसणाचे भाव पुन्हा काहीसे वाढले आहेत. सध्या लसणाला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.      

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT