Cotton Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस घटत चालली ?

Market Update : दिवसेंदिवस बाजारातील आवक कमी झाल्याने भावाला आधार मिळत आहे. त्यातच निर्यातीसाठीही चांगली मागणी आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin : देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आज कापूस भावात १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली होती. बाजारातील आवकही कमी झाली आहे. काल देशातील बाजारात १ लाख ४ हजार गाठींची आवक झाली होती. दिवसेंदिवस बाजारातील आवक कमी झाल्याने भावाला आधार मिळत आहे. त्यातच निर्यातीसाठीही चांगली मागणी आहे.

त्यामुळे कापसाचा भाव आज ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान पोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली तेजी आली आहे. कापसाचे भाव यापुढील काळातही तेजीतच राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत. राज्यात तसेच देशातील इतर महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमधील काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची किरकोळ आवक सुरु झाली. खुल्या बाजारात सध्या हरभरा चांगलाच भाव खात आहे.

त्याचा परिणाम बाजारातील दरावरही दिसून येत आहे. हरभरा भाव सध्या ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर यंदा हरभरा उत्पादनातही घट होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे हरभऱ्याचे भाव यंदा चांगले राहू शकतात, असाही अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. कांद्याचा भाव काही बाजारात स्थिरावलेला दिसतो तर काही बाजारांमध्ये भाव काहीसे नरमले आहेत. बाजारातील आवकही कमी होताना दिसत आहे. पण सरकारच्या धोरणांचा बाजारावर परिणाम दिसून येतो. सध्या कांद्याचा सरासरी भाव १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला.

काही बाजारांमध्ये उन्हाळ कांद्याचीही आवक सुरु झाली आहे. पण उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. तर देशात भावपातळी कायम आहे. देशातील बाजारातील सरासरी दरपातळी आज ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.

बाजारातील आवकही टिकून आहे. तसेच मागणी मंदावलेली आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारावरील दबाव कायम दिसतो. आणखी काही दिवस सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते. बाजारात ज्वारीची आवक वाढली आहे. रब्बीतील ज्वारी बाजारात येत असल्याने पुरवठा वाढलेला दिसतो. पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून येत आहे.

त्यामुळे हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते. सध्या ज्वारीला ३ हजार ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT