Marker Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: हरभऱ्याचे भाव टिकून; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत पपई दर?

Daily Commodity Rate: आज आपण सोयाबीन, कापूस, पपई आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

सोयाबीनमध्ये चढ उतार

ब्राझीलमधील सोयाबीनची धिम्या गतीने सुरु असलेली काढणी आणि अर्जंटीनात मधल्या काळात पावसाने मारलेली दांडी, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीसे चढ उतार दिसत आहेत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.५० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते.

देशात मात्र सोयाबीनचा बाजार स्थिर होता. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३५० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे. ही आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

पपईच्या दरात सुधारणा

राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे पपईच्या दरात सुधारणा दिसून आली. राज्यातील पपई उत्पादक भागात सध्या खरेदीदारांची रेलचेल दिसत आहे. पंजाब, हरियाना, काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी भागातील खरेदीदार राज्यात पपईची खरेदी करत आहेत. याचा आधार पपईच्या भावाला मिळत आहे.

पपई भाव मागील काही आठवड्यांमध्येच क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. सध्या पपईला सरासरी १७०० ते १८०० रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा पपई पिकाचे नुकसान झाल्याने पपईची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गहू दरात सुधारणा

देशातील बाजारात गव्हाची आवक कमीच आहे. दुसरीकडे यंदा सरकारने गहू उत्पादनात वाढीचा अंदाज दिला तरी याबाबत बाजाराच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे बाजाराला आधार मिळत आहे.

सरकारने स्टाॅकमधील गहू विकल्यानंतर आठवडाभरातच पुन्हा गव्हाचे भाव वाढायला सुरुवात झाली होती. आज बाजारात गहू २८०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकला गेला. नवा माल बाजारात येईपर्यंत गव्हाची टंचाई कायम राहणार आहे. त्यामुळे दरातही चढ उतार राहतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा नरमला

हरभऱ्याचे मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. हरभऱ्याच्या भावातील तेजी कमी झाल्यानंतर आवक कमी दिसत आहे. यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आयातही चांगली राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

मात्र प्रत्यक्ष बाजारात किती माल येतो यानंतर बाजाराची दिशा ठरेल. सध्या देशातील बाजारात हरभरा भाव ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. हरभरा बाजारात नवा माल दाखल होईपर्यंत चढ उतार दिसू शकतात, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

कापूस दबावातच

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावावरील दबाव कायम आहेत. त्यामुळे भावपातळी एका मर्यादेत कमी जास्त होताना दिसत आहे. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव ६६.६७ सेंट प्रतिपाऊंडवर कापूस भाव होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे देशातील दरावरही दबाव येत आहे. तसेच आवकही चांगली सुरु आहे.

रोजची आवक दीड लाख गाठींच्या दरम्यान राहत आहे. त्याचाही दरावर दबाव येत आहे. आजही देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होता. तर सरकी ३ हजार ४०० ते ३ हजार ६०० रुपायंच्या दरम्यान विकली जात आहे. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT