Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशातील तूर उत्पादन यंदाही घटण्याचा अंदाज

Market Bulletin : देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आल्यानंतर मागील काही दिवसांपासून मात्र स्थिरावलेले दिसतात. तुरीचे भाव मागील सहा महिन्यांमध्ये जवळपास दुप्पट झालेले आहेत. पण मागील काही दिवसांपासून तुरीचे भाव स्थिरावले आहेत.

Team Agrowon

1. कापसाच्या वायद्यांमध्ये सध्या चढ उतार सुरु आहेत. देशातील वायदे आज दुपारपर्यंत ३६० रुपयांनी नरमले होते. वायदे ६० हजार ७०० रुपयांपर्यंत पोचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे काहीसे कमी होऊन ८६.८७ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. देशातील बाजार समित्यांमधील भावपातळी आजही कायम होती. सध्या कापसाला देशभरात सरासरी ७ हजार ते ८ हजारांचा भाव मिळत आहे. आणखी काही दिवस हा भाव कायम राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी दिला. 

2. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर दिसतो. सोयाबीनची भावपातळी ४ हजार ५०० ते ५ हजारांच्या दरम्यान आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरु आहेत. देशात यंदा सोयाबीन पिकाला दुष्काळाचा फटका बसत आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन कमीच राहू शकते, असा अंदाज आहे. याचा आधार सोयाबीन दराला मिळू शकतो, असे जाणकारांनी सांगितले.  

3. हिरव्या मिरचीचे दर तेजीतच आहेत. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही महिन्यांपासून कमीच आहे. तर उठाव चांगला आहे. यामुळे हिरव्या मिरचीचे भाव वाढलेले आहेत. सध्या हिरव्या मिरचीला ३ हजार ते ४ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवकही पुढील काही दिवस सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरही कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

4. बाजारात शेवग्याचे भाव टिकून आहेत. कमी पावसामुळे बाजारातील शेवग्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र शेवग्याला असलेला उठाव कायम आहे. यामुळे शेवग्याचे भाव सरासरी २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही दुष्काळी स्थितीमुळे शेवग्याची आवक कमीच राहून दर स्थिर दिसू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

5. देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आल्यानंतर मागील काही दिवसांपासून मात्र स्थिरावलेले दिसतात. तुरीचे भाव मागील सहा महिन्यांमध्ये जवळपास दुप्पट झालेले आहेत. यामुळे नफावसुलीसाठी स्टाॅकमधील तुरही विकली जात आहे. तसेच आफ्रिकेतून तुरीची आयात आता सुरु झाली. यामुळे बाजारात तुरीची उपलब्धता काहीशी वाढली आहे. परिणामी दर स्थिरावले आहेत. सध्या बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ११  हजार ते १२ हजारांचा भाव मिळत आहे. पण तुरीचे भाव पुढील काळातही तेजीत राहण्याचा अंदाज आहे. एकतर यंदाही देशातील तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात घटली. दुसरं म्हणजे तुरीच्या पिकाला कमी पावसाचा मोठा फटका बसत आहे. परिणामी यंदाही देशातील तूर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यंदाचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षाही कमी राहील, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या आयात होणाऱ्या तुरीचेही भाव तेजीत आहेत. आफ्रिकेतील देशातून आयात होणाऱ्या तुरीला सध्या ८ हजार ५०० ते ९ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. यामुळे देशातील तुरीलाही आधार मिळतोय. तसेच पुढील काही दिवसांमध्ये तुरीला आणखी उठाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या भावातील तेजीही टिकून राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT