Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याचे भाव नरमले

Market Bulletin : सोयाबीन आणि कापसाच्या भावात सतत चढ उतार सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपला माल विक्री करताना बाजाराची माहिती आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापसाच्या भावात सतत चढ उतार सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपला माल विक्री करताना बाजाराची माहिती आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

कापसाच्या वायद्यांमध्ये आजही नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे मागील काही दिवसांपासून नरमलेलेच आहेत. देशातील वायदे आज २६० रुपयांनी कमी होऊन प्रतिखंडी ५८ हजार २०० रुपयांपर्यंत आले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८० सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारच्या सत्रानंतर काहीसे वाढले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान राहीले. बाजारातील कापूस आवक दिवाळीनंतर काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे. बाजारातील आवक कमी झाल्यास कापसाचे भाव काहीसे वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनच्या भावात आजही काहीशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे सव्वा टक्क्याने सुधारले होते. सोयाबीनचे वायदे आज १३.६७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदेही एक टक्क्याने वाढले होते. सोयाबीनचे वायदे ४४४ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी मात्र कायम होती. सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान मिळाले. बाजारातील सोयाबीन आवक आणि खाद्यतेलाचे कमी झालेले भाव यामुळे सोयाबीनच्या भावावर दबाव आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

कांद्याचे भाव आज काहीसे नरमले होते. बाजारात कांदा आवकही गेल्या आठवड्याच्या तुलनेत काहिशी अधिक दिसते. केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य दप्पट करून ८०० डाॅलर प्रतिटन केले. तसेच केंद्र सरकार बाजारावर लक्ष ठेऊन आहे. दिवाळीमुळे कांद्याचे भाव वाढू न देण्याची सरकारची भुमिका दिसते. आज कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. पण सध्या देशात कांद्याची टंचाई आहे. यंदा खरिपातील कांदा लागवडी कमी झाल्या. तर बदलत्या वातावरणाचा आणि पाणी टंचाईचा फटका कांदा पिकाला बसला. पुढील दीड ते दोन महिने कांद्याची टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भावही तेजीतच राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

आज मक्याच्या भावात अनेक बाजारांमध्ये क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. यंदा खरिपातील मक्याचे उत्पादन कमी झाले. मक्याला उठावही कमी आहे. त्यामुळे मक्याला आज सरासरी १ हजार ८०० ते २ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सध्या इतरही धान्याचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे मक्यालाही उठाव मिळतोय. रब्बीतील मका उत्पादही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक जास्त काळ वाढलेली दिसणार नाही. तसेच मक्याला उठावही बऱ्यापैकी आहे. यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीच्या भावातील वाढ कायम आहे. दिवाळी आणि दसऱ्यामुळे तुरीला मागणी वाढली होती. तसेच ही वाढलेली मागणी अद्यापही कायम आहे. त्यामुळे तुरीच्या भावातही वाढ झाली. तुरीचे भाव मागील तीन आठवड्यांपासून किमान एक हजार रुपयांनी वाढले होते. सध्या देशातील बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १२ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारात सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे. त्यामुळे तुरीच्या भावात चांगलीच वाढ झाली. सरकार तुरीची आयात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण भारतात भाव वाढल्याने निर्यातदार देशही तुरीची निर्यात मर्यादीत स्वरुपात करत आहेत. निर्यातदार देशांनाही चांगल्या भावाची अपेक्षा आहेच. त्यामुळे तुरीचे भाव देशातील बाजारात तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purandar Drought Condition: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे संकट; २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्र बाधित

Kharif Crop Damage: मावळमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; भात, सोयाबीन, भुईमुगाला ७० ते ८० टक्के फटका

Agricultural Infrastructure: शेतीमाल मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधांवर भर; नवीन गोदामे, शीतगृहे आणि विकिरण केंद्रे उभारणार: पणनमंत्री जयकुमार रावल

Sugarcane Farm Fire: पेटत्या उसात शिरून २५ एकर ऊस वाचविला

Sugarcane Price Dispute: सांगली जिल्ह्यात रात्री ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात; ऊसदराचा तिढा कायम; शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT