Potato Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Potato Market : राज्यात बटाटा ७०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल

Potato Rate : गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी कृषी उत्पन्न बाजार समितीत आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची दररोज सरासरी ५०० टनांची आवक सुरू आहे. तर दहा किलोचे दर १०० ते १५० रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Team Agrowon

पुण्यात १०० ते १५० रुपये प्रति दहा किलो

गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी कृषी उत्पन्न बाजार समितीत आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची दररोज सरासरी ५०० टनांची आवक सुरू आहे. तर दहा किलोचे दर १०० ते १५० रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सध्या मध्य प्रदेशातील इंदूर भाग, आग्रा भागातून दररोज ३०० टनांची आवक होत आहे. तर पुणे विभागातून तळेगाव, सातारा पुसेगाव आणि पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांतून कमीअधिक प्रमाणात बटाट्याची आवक सुरू आहे. दिवाळी सणामुळे बाजारात कमी मागणी आहे. त्यातच आवकही तुलनेत बऱ्यापैकी असल्याने दरही काही स्थिर आहेत. किरकोळ बाजारात बटाट्याची प्रति किलो २० ते ३० रुपयांच्या दरम्यान विक्री सुरू आहे. गेल्या रविवारी बट्याट्याची ३० ट्रक आवक झाली होती.

गेल्या एक महिन्यापूर्वी बटाट्याची आवक जास्त होते. परंतु त्यानंतर आवकेत काही प्रमाणात घट झाली असून सध्या २५ ते ३० गाड्याची आवक सुरू आहे. परंतु ग्राहक कमी असले तरी दर स्थिर आहेत.

नांदेडला बटाटा १००० ते १३०० रुपये

नांदेड शहराजवळील बोंढार बाजारात सध्या बटाटा उत्तर प्रदेशातून येत आहे. या बटाट्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नांदेड शहराजवळील बोंढार हवेली येथे आठवड्यातून रविवारी व बुधवारी बटाटे, कांदा, आले, लसूण या शेतीमालाचा लिलाव होतो.

या ठिकाणी सध्या उत्तर प्रदेशातून बटाटा आवक होत आहे. बुधवारी (ता. १५) दोनशे ते अडीचशे टन बटाट्याची आवक झाली. या बटाट्याला १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. हा बटाटा किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

जळगावात १२०० ते १६०० रुपये

कृषी उत्पन्न बाजार समितीत दर शुक्रवारी व शनिवारी बटाट्याची आवक होते. आवक मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून होते. काही अडतदार, व्यापारी पुणे व इतर भागातूनही बटाट्याचा पुरवठा करून घेतात. बटाट्यास बाजार समितीत १२०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मागील दोन ते अडीच महिन्यांपासून मिळत आहे. आवक स्थिर व दरही टिकून आहेत.

दर्जेदार किंवा गोलाकार प्रकारच्या बटाट्याचे दर १६०० रुपयांवरही असतात. बाजार समितीत रोज किंवा नियमित बटा़ट्याची आवक होत नाही. मागील शनिवारी (ता. ११) बट्याची १८० क्विंटल आवक झाली होती. दर प्रतिक्विंटल १२५० किमान व कमाल दर १६०० रुपये आणि सरासरी दर १५०० रुपये असे मिळाले होते. पुढे आवक वाढू शकते, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.

अकोल्यात ८०० ते १३०० रुपये

स्थानिक बाजार समितीत सध्या बटाट्याची ७०० क्विंटलपेक्षा अधिक आवक होत असून गुरुवारी (ता. १६) किमान दर ८०० व कमाल दर १३०० रुपयांपर्यंत होते. येथील बाजारात बटाट्याची आवक ही प्रामुख्याने उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील विविध भागांतून होत असते. गेल्या काही दिवसांपासून ६०० ते ७०० क्विंटलदरम्यान आवक आहे. गुरुवारी ७८० क्विंटलची आवक झाली होती.

बाजारात चांगल्या दर्जाचा बटाटा १३०० रुपयांपर्यंत विक्री झाला. तर दुय्यम माल ८०० रुपयांदरम्यान विकला. बटाट्याची किरकोळ विक्री २० ते २५ रुपये प्रतिकिलोने सुरू होती. सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक वाढलेली असल्याने बटाट्याचा उठाव स्थिरावेलला आहे. त्यामुळे दरातही काही दिवसांपासून बदल झालेला दिसून आला नाही, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्ये ९५० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५) बटाट्याची आवक २७१५ क्विंटल झाली. त्यास ९५० ते १६०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १३०० रुपये होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गत सप्ताहापासून आवकेत चढउतार दिसून आली सध्या आवक कमी असली तरीही दर घसरले आहेत.

बाजारपेठेत आवक वाढून मागणीत घट झाल्याने दर सर्वसाधारण आहेत. सोमवारी (ता. १२) आवक १,४०५ क्विंटल झाली. त्यास १,१५० ते १,७०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १,५०० होता. शनिवारी (ता. ११) आवक १,४०१ क्विंटल झाली. त्यास ८५० ते १,६०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३०० होता. शुक्रवारी (ता. १०) आवक १,५३१ क्विंटल झाली. त्यास ९०० ते १,५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १,२५० होता. गुरुवारी (ता. ९) बटाट्याची आवक १,३१५ क्विंटल झाली. त्यास ९५० ते १,६०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १,३०० होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT