Urad Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Urad Rate : उडदाला चांगला भाव मिळणार का?

देशात यंदा उडदाचे उत्पादन घटले. मात्र गुणवत्ता कमी असल्याने दाल मिल उद्योगाकडून अपेक्षेप्रमाणे उठाव मिळत नाही.

Team Agrowon


अनिल जाधव
पुणेः देशात यंदा उडदाचे उत्पादन (Urad Production) घटले. मात्र गुणवत्ता कमी असल्याने दाल मिल उद्योगाकडून अपेक्षेप्रमाणे उठाव मिळत नाही.

परिणामी उडदाचे भाव काहीसे नरमले आहेत. सध्या उडदाला सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे, असे कडधान्य बाजारातील जाणकारांनी सांगितले.

देशात यंदा उडदाचे उत्पादन कमी झाले. त्यातच उडदाची गुणवत्ता घसरली. त्यामुळं देशातील उडदाला प्रक्रिया उद्योगाकडून सध्या कमी उठाव आहे.

त्यामुळं देशातील उडीद उत्पादन कमी असूनही उडदाचे दर (Urad Rate) काहीसे दबावात आहेत. सध्या प्रक्रिया उद्योग म्यानमारमधून आयात होणाऱ्या उडदाला जास्त पसंती देत आहेत.

सध्या देशात म्यानमारमधून आयात होणाऱ्या उडदाची उपलब्धता मर्यादीत आहे. कारण आयात होणाऱ्या उडदाचा निपटारा लगेच झाला.

त्यामुळं बंदरांवरही आयात उडदाचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. देशातही उडदाचे उत्पादन कमी झाले. मात्र विक्री जास्त असल्याने दर दबावात आहेत.

उडदाला दालमिल उद्योगातून मोठी मागणी असते. तसेच पापड उद्योगाकडूनही चांगला उठाव मिळत असतो. पापड उद्योग फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होईल.

म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून पापड उद्योगाकडून पापडाला मागणी वाढेल. त्यावेळी देशातील उदडाला चांगला उठाव मिळेल.

परिणामी दरालाही आधार मिळेल, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

यंदा देशातील उडीद उत्पादन घटले तरी पावसाने गुणवत्ता कमी आली. त्यामुळे या उडदापासून दाळ निर्मिती करणं अवघड जात असल्याचे जाणकार सांगत आहेत.

त्यामुळे देशातील उडदाचे सरासरी दर काहीसे नरमले. सध्या देशातील उडदाला ६ हजार ६०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत.

मात्र यंदा उत्पादन कमी असल्याने फेब्रुवारीपासून पापड उद्योगाची मागणी वाढल्यानंतर उडदाचे दर वाढू शकतात.

तसेच भारताला उडीद निर्यात करणारा म्यानमार हा एकमेव देश आहे. म्यानमारमधून आयातीलाही मर्यादा आहेत.

त्यामुळे यंदा उडदाचे दर तेजीत राहू शकतात, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT