soybean market agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market : सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा आधार मिळणार

देशातील बाजाराला शनिवारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा आधार मिळाला नव्हता. मात्र पुढील आठवड्यात सोयाबीन दरात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.

Team Agrowon

अनिल जाधव
पुणेः मागील आठवडाभर देशातील सोयाबीन बाजार (Soybean Market) स्थिर राहीला. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात (Soybean rate) सुधारणा झाली होती. मात्र देशातील बाजाराला शनिवारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा आधार मिळाला नव्हता. मात्र पुढील आठवड्यात सोयाबीन दरात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात सोयाबीन दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी बाजार १४.४१ डाॅलर प्रतिबुशेल्सने सुरु झाला. तर शुक्रवारी बाजार १४.८२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाला. म्हणजेच सोयाबीन बाजार आठवड्याच्या शेवटी तीन टक्क्यांनी वाढीसह बंद झाला. चालू आठवड्यातील उचांकी दरही आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच मिळाला. काल सोयाबीनने १४.९२ डाॅलरचा टप्पा गाठला होता. मात्र दर या पातळीवर टिकले नाहीत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर वाढण्याला प्रामुख्याने दोन घटक कारणीभूत ठरले. एकतर चीनमधील नागरिकांनी सरकाच्या कोरोना निर्बंधाविरोधात निदर्शने केली. त्यामुळे चीन सरकारने काही शहरांमधील निर्बंध शिथिल केले. त्यामुळे येथील पशुखाद्य आणि खाद्यतेल बाजारातून सोयाबीनला मागणी वाढली. त्यामुळे सहाजिकच सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली.

दुसरे म्हणजे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सोयाबीन उत्पादक अर्जेंटीनात काही भागांमध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली. अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पाऊस कमी असल्याने पेरणीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा अर्जेंटीनातील सोयाीबन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर ब्राझीलमध्येही काही भागांमध्ये कमी पाऊस असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र येथील तीव्रता सध्या  कमी आहे. पण या दोन्ही देशांतील कमी पावसाच्या वृत्ताने सोयाबीन बाजाराला आधार मिळाला.

………………

देशातील बाजार सुस्तच
मात्र देशातील सोयाबीन बाजार या आठवड्यात सुस्तच राहीला. सोयातेलाचे दर कमी झाल्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीपासूनच देशातील दर नरमले होते. मागील आठवडाभर सोयाबीनचे दर सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान राहीले. या दरम्यान दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार पाहायला मिळाले. पण दर किमान किंवा कमाल पातळीवर टिकले नाही. त्यामुळे आठवड्याच्या शेवटीही हीच दरपातळी होती. शनिवारी काही प्रक्रिया प्लांट्सने दर वाढवले होते. मात्र दर सरासरी ५ हजार ७०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते.

…………….
दर सुधारण्याचा अंदाज
या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा झाली. मात्र सोयातेलाचे दर दबावात होते. पण याच आठवड्यात सोयातेलाचे दर सुधारण्यास अनुकूल बातम्या आल्या. त्यामुळे पुढील आठवड्यात देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात सोयाबीन दर सुधारतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT