Palm Oil Export 
बाजार विश्लेषण

इंडोनेशियाचा पाम तेल निर्यातबंदीचा निर्णय

सोयाबीनला होणार फायदा; खाद्यतेल दरवाढीची शक्यता

अनिल जाधव

पुणे ः खाद्यतेल महागाई आणि लोकांचा रोष बघता इंडोनेशिया सरकारने २८ एप्रिलपासून पाम तेल निर्यातबंदी (Palm Oil export) करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukaraine War) आधीच सूर्यफूल तेल पुरवठा (Sunflower Oil Suppy) ठप्प होऊन पामतेलासह सोयाबीन तेलाचे दर वाढले आहेत. त्यातच इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरवाढीचा (Edible Oil Rate) भडका उडेल. परिणामी, देशांतर्गत बाजारात सोयाबीन आणि मोहरी तेलाला मागणी वाढेल. त्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा होईल, असे जाणकारांनी सांगितले.

भारत जगात सर्वांत मोठा खाद्यतेल आयातदार (Edible Oil Importer) आहे. भारताने मागील वर्षात १३३ लाख टन खाद्यतेल आयात केली. त्यात ८३ लाख टन पाम तेलाचा समावेश होता. तर ५० लाख टन इतर खाद्यतेलांची आयात झाली. म्हणेजच एकूण आयातीत पाम तेलाचा वाटा ६२ टक्के होता. भारताला पाम तेलाचा सर्वाधिक पुरवठा करणारा देश म्हणजेच इंडोनेशिया. इंडोनेशियातून जवळपास निम्मे म्हणजेच ४० ते ४५ लाख टनांच्या दरम्यान पाम तेल आयात होते. त्यानंतर मलेशियातून ३८ लाख टन पाम तेल येते. त्यानंतर थायलंडमधूनही काही प्रमाणात आयात होते.

इंडोनेशियाने आता २८ एप्रिलपासून सर्व प्रकारच्या खाद्यतेलाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी शुक्रवारी (ता. २२) ही घोषणा केली. इंडोनेशियात मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाची मोठी टंचाई भासत आहे. खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले. लोकांना खाद्यतेलासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या रांगांमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या आल्या. महागाई प्रचंड वाढल्याने येथील नागरिकांच्या मनात अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता कमी करण्यासाटी राष्ट्रपती विडोडो यांनी पुढील सूचना येईपर्यंत खाद्यतेल निर्यात बंद केली आहे.

इंडोनेशियाने पामतेल निर्यातबंद केल्यास येथील खाद्यतेलाचे दर कमी होतील. मात्र भारतात खाद्यतेलाच्या दराला पुन्हा फोडणी मिळेल. केवळ भारतच नाही, तर जगभरात पाम तेलाच्या दरात मोठी तेजी येईल. मलेशियासह पामतेल उपलब्ध असलेले देश दर वाढवतील. म्हणजेच इंडोनेशियाच्या या निर्णयाचा फायदा मलेशिया, थायलंड, कोलंबिया आदी देशांना होईल. हे देश निर्यातीसाठी तेलाचे दर वाढवतील.

दरवाढीचा भडका उडणार

आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात सूर्यफूल तेलाचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे ही मागणी पाम तेलाकडे वळाली होती. परिणामी, पाम तेलाचे दर तेजीत आले होते. फेब्रुवारीत पाम तेलाचा भाव १५९४ डॉलर प्रतिटन होता, तो आता १८२८ डॉलरवर पोहोचला. मात्र आता जगातील सर्वांत मोठ्या पाम तेल उत्पादक देशानेच निर्यात बंद केली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरवाढीचा भडका उडणार, हे नक्की.

ग्राहकांची होरपळ वाढणार

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम थेट भारतातील दरावरही होईल. कारण हा भारातासाठी दुसरा झटका असेल. कारण आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफूल तेल आयात ठप्प झाली. त्यातच आता इंडोनेशियाने पामतेल निर्यात बंद केली. त्यामुळे देशात खाद्यतेलाचा तुटवडा आणखी वाढू शकतो. परिणामी, खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होईल. आधीच महागाईमध्ये होरपळणाऱ्या नागरिकांवर खाद्यतेल दरवाढीचे हे नवे संकट असेल, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT