Soybean Market Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market : सोयाबीन बाजार आज कसा राहीला?

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर काहीसे नरमले. सोयापेंडही दोन टक्क्यांनी नरमलं. तर खाद्यतेल बाजारात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारात मात्र सोयाबीन एकाच भावपातळीवर ठाण मांडून आहे.

Anil Jadhao 


अनिल जाधव
पुणेः आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर काहीसे नरमले. सोयापेंडही दोन टक्क्यांनी नरमलं. तर खाद्यतेल बाजारात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारात मात्र सोयाबीन एकाच भावपातळीवर ठाण मांडून आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीन बाजारात आज नरमाई पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन एक टक्क्याने नरमलं. सोयाबीनचे वायदे आज १४.७१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. एक बुशेल म्हणजेच सुमारे २७ किलो सोयाबीन. क्विंटलमध्ये हिशोब केल्यास सीबाॅटवरील हा दर प्रतिक्विंटल साडेचार हजार रुपये होतो. आता तुम्ही म्हणालं, आपल्याकडं सोयाबीनला पाच हजरांपेक्षा जास्त दर मिळतोय. मग अमेरिकेच्या सोयाबीनला कमी दर का? तर अमेरिकेचं सोयाबीन जणुकीय सुधारित म्हणजेच जीएम असतं. तर आपल्याकडं नाॅन जीएम सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं.

मात्र देशातील बाजारात सोयाबीनचे दर आजही स्थिर होते. उद्योगांकडून गरजेप्रमाणं होणारी खरेदी, शेतकऱ्यांची मर्यादीत विक्री आणि खाद्यतेल बाजाराचा दबाव, यामुळं देशातील सोयाबीन बाजार स्थिर आहे. मागील तीन आठवड्यापासून सोयाबीन बाजार एका भावपातळीवर आहे. आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.

…………..
सोयातेलाचे दर सुधारले

खाद्यतेल बाजाराचा विचार करता सोयाबीन तेलाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज सोयातेल ६२.८६ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले. क्विंटलमध्ये सोयातेलाचा दर १३९ डाॅलर, म्हणजेच ११ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होतो. तर पामतेलाच्या दरातही काहीशी सुधारणा झाली होती. आज पामतेलाचे वायदे ३ हजार ८४१ रिंगीटवर बंद झाले. भारतीय रुपयात हा दर जवळपास ७२ हजार रुपये प्रतिटन होतो.

………….
सोयापेंड खातेय भाव

मात्र सोयापेंडचे दर आज दोन टक्क्यांनी नरमले होते. सोयापेंडच्या वायद्यांनी आज ४४९ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला. रुपयात हा दर प्रतिटन ३७ हजार २०० रुपये होतो. तर देशातील सोयापेंडचे दर सरासरी ४२ हजार रुपयांवर आहेत. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी. ती म्हणजे भारतीय सोयापेंड नाॅन जीएम आहे तर अमेरिकेचं जीम. त्यामुळं भारतीय सोयापेंडचे दर जास्त असतात. मात्र सध्या अमेरिकेची सोयापेंड महाग झाली आहे. त्यामुळं देशातून सोयापेंड निर्यात वाढली.

…………..
बाजाराला आधार

आज खाद्यतेल बाजारात सुधारणा झाली. तर देशातून सोयापेंड निर्यात वाढत आहे. याचा फायदा सोयाबीन बाजाराला मिळू शकतो. तसंच सोयाबीनचे वायदेही सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळं पुढील काळात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.

 --

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT