Cotton Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Rate : कापसाची झळाळी कायम

कापसाच्या दरात सध्या क्विंटलमागं सरासरी ८०० ते एक हजार रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे.

अनिल जाधव

अनिल जाधव
पुणेः कापसाच्या दरात (Cotton Rate) ध्या क्विंटलमागं सरासरी ८०० ते एक हजार रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. देशातील बाजारात मागील आठवड्यात कापसाचे किमान दर ससरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांपर्यंत कमी झाले होते. तर कमाल दर ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता. मात्र आता कापासचा किमान दर सरासरी ८ हजार रुपयांपर्यंत वाढला. तर कमाल दारने ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.

मागील आठवड्याच्या मध्यापासून कापसाचे दर वाढले. मात्र दर वाढूनही देशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमी आहे. पण दुसरीकडे उद्योगांकडून कापसाला उठाव मिळतो आहे. त्यामुळे कापसाचे दर मागील काही दिवसांपासून वाढलेले दिसत आहेत. आजही काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. पण सर्वसाधारणपणे विचार केल्यास दर काहीसे स्थिर दिसत होते.

आज बहुतांशी राज्यातील कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोचला होता. तर कमाल दरानं ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. आज महाराष्ट्रातील कापसाचा दर सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहिला. तर गुजरातमध्येही सरासरी ८ हजार ते ९ हजार ३०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. पंजाब, हरियाना, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात याच दरम्यान कापसाचे व्यवहार झाले.

सरकीच्या दरातही काही बाजारांमध्ये आज क्विंटलमागं सरासरी ५० रुपयांची सुधारणा झाली होती. सरकीचा किमान दर आता ३ हजार ७०० रुपयांवर पोचला. तर कमाल दरानं ४ हजारांची पातळी गाठली. काही बाजारांमध्ये ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. सरकीला आज महाराष्ट्रात सरासरी ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर मध्य प्रदेशात ३ हजार ६०० ते ३ हजार ८०० रुपये, गुजरातमध्ये ३ हजार ७५० रुपये ते ४ हजार ५० रुपये आणि उत्तर भारतात ३ हजार ९०० ते ४ हजार २०० रुपयाने सरकीचे व्यवहार झाले.

बाजारात सध्या कापसाचे दर वाढत आहेत. मात्र त्या प्रमाणात आवक वाढलेली दिसत नाही. पुढील काही दिवस शेतकऱ्यांना कापसासाठी सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं बाजाराचा आढावा घेऊनच विक्री फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT