Summer Onion
Summer Onion Agrowon
बाजार विश्लेषण

बांगलादेशने केली भारतीय उन्हाळ कांद्याची कोंडी

मुकूंद पिंगळे

नाशिक : भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीत (Onion Export) एकट्या बांगलादेशचा वाटा २६.७३ असल्याची नोंद आहे. मात्र महिन्यापासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याची मागणी (Onion Demand) रोखली असल्याचा प्रकार समोर आला आहे. बांगलादेशमध्ये स्थानिक कांद्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कांदा सीमेपर्यंत जाऊनही पुढे बांगलादेशमध्ये जात नसल्याने व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. दरामुळे शेतकरी तर आता कांदा व्यापारी व निर्यातदार (Exporter) कोंडीत सापडल्याची स्थिती आहे.यास अस्थिर कांदा धोरणे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बांगलादेशला जो कांदा आयात करावा लागतो, तो बहुतांश भारतातून निर्यात केला जातो. मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २०१९ साली निर्यातबंदी केल्यानंतर बांगलादेशकडून मागणी असताना पुरवठा थांबविण्यात आला.

यावेळी बांगलादेश सरकारकडून मागणी होऊनही सहकार्य झाल्याने या निर्णयाची झळ बसली. वारंवार निर्यातबंदी होण्यामुळे पर्यायी पाकिस्तान, म्यानमार, ब्रम्हदेश आणि अफगाणिस्तान या देशांकडून गरज पूर्ण केली. त्यामुळे स्पर्धक म्हणून इतर देशांनी बाजारपेठ काबीज केली जात आहे. ही बाब देशातील कांदा पिकासाठी आव्हानात्मक बनत आहे. भारतीय कांदा निर्यातदारांसाठी बांगलादेश ही प्रमुख बाजारपेठ आहे. या देशाने असा निर्णय घेतल्याने पुरवठा साखळी पूर्णपणे प्रभावित झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कांदा साठवणूक पश्चात उरलेला दुय्यम प्रतवारीचा व कमी टिकवणक्षमता असलेला माल बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठवला जातो. इतर देशात प्रतवारी आवश्यक असते. त्यामुळे मागणी व पुरवठा संतुलित राहिल्याने दर टिकून राहतात. मात्र आता उपलब्ध कांद्याची निकासी करण्यात अडचणी निर्माण झाल्याने दराला मोठा फटका बसला आहे.
एकीकडे बांगलादेश सरकारने स्थानिक कांदा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी व महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तर श्रीलंकासारख्या देशात आर्थिक टंचाईमुळे निर्यात कमी आहे. तेथील आयतदारांकडून पेमेंट वेळेवर मिळत नसल्याने स्थिती आहे. आता ही घडी पुन्हा बसण्यासाठी बांगलादेशमध्ये निर्यात सुरळीत राहणे औचित्याचे आहे.

कांदा व्यापारी संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष
मे पासून बांगलादेश निर्यात बंद असल्याने सीमेवरील व्यवहार सुरळीत व्हावे, अशी मागणी नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे यांना १२ मे रोजी पत्र लिहून बांगलादेशाची बॉर्डर चालू करण्याबाबत मागणी केली. मात्र ‘त्यांना ना दिलासा, मिळाला ना उत्तर’ अशी परिस्थिती आहे.

...तर दरात सुधारणा शक्य
देशात प्रामुख्याने नाशिक कांदा उत्पादनात कायम आघाडीवर राहिला आहे. मात्र राज्यातही लागवडी वाढल्या आहेत. मात्र कमी उत्पादकता व दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच बांगलादेश सीमा बंद झाल्याने कांदा दरात मोठी तफावत आहे. त्यामुळे बांगलादेशाची सीमा खुली झाल्यास शेतकऱ्यांना क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ मिळू शकते.त्यामुळे बंद सीमा खुल्या करण्यात याव्या, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र याबाबत केंद्राचे अद्यापही दुर्लक्ष असल्याची स्थिती आहे.

बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आजवर राहिली आहे.मात्र निर्यातबंदीमुळे बांगलादेश सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना लागवडीस प्रोत्साहन दिले. कांद्यात स्वयंपूर्णता आणण्यासह कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या तेथील काढणी झालेल्या मालाची बाजारात विक्री होण्यासाठी भारतीय कांद्याची आयात थांबवली. त्याचा हा परिणाम आहे. मात्र केंद्राने अद्याप काहीही पावले उचललेली नाही. तेथे लागवडी वाढल्यास बाजारपेठ हातातून जाईल. त्यामुळे स्थिर निर्यात धोरणाचा विचार व्हावा.
खंडूकाका देवरे, अध्यक्ष, नाशिक कांदा व्यापारी असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT