Tur Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Tur Import : मोझांबिकमधून तूर आयात थांबली, तरी भाव टिकून राहण्यास अनुकूल स्थिती

Tur Production : तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे तूर उत्पादनात आणखी घट होण्याचा अंदाज असून दरातही सुधारणा होऊ शकते,असा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : मोझांबिकने स्वस्त भावात तूर देण्यास नकार दिल्यानंतर भारताने दबाव वाढवला होता. त्यामुळे मोझांबिकमधील निर्यातदारांनी कोर्टात धाव घेतली होती.मोझांबिकच्या कोर्टाने भारताला चांगलाच झटका दिला.यामुळे आफ्रिकेतील इतर देशांच्या तुरीचेही भाव वाढले.तर देशातील महत्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे तूर उत्पादनात आणखी घट होण्याचा अंदाज असून दरातही सुधारणा होऊ शकते,असा अंदाज आहे.

भारताने मोझांबिकसोबत वर्षाला दोन लाख टन तूर आयातीचे करार केले आहेत.म्हणजेच मोझांबिक भारताला दोन लाख टन तूर देणार आहे. आता भारताला तुरीचा तुटवडा जाणवतो.यामुळे तुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत.नेमक याच काळात मोझांबिकमध्ये तुरीची उपलब्धता आहे.तुरीचे भाव कमी करण्यासाठी मोझांबिकने सर्व तूर भारताला लगेच निर्यात करावी,असा दबाव भारताच्या वतीने टाकण्यात आला. मोझांबिकमध्ये दीड ते दोन लाख टन तुरीचा स्टाॅक आहे, पण येतील निर्यातदार निर्यात करत नाही. त्यांना भारताच्या अडचणीचा फायदा घेऊन जास्त भाव वसूल करायचा, अशी मांडणी करत भरतातील आयातदारांनी मोझांबिकसोबतचे करार रद्द करण्याची मागणी केली. भारत सरकारने मोझांबिक सरकार सोबत अनेकदा चर्चाही केली.

भारत सरकारने सर्व प्रयत्न करूनही मोझांबिकमधून आयात वाढत नव्हती. कारण होतं करार. भारताचा करार झाला आहे दोन लाख टनांचा. आता मोझांबिकमधील निर्यातदारांचं म्हणणं आहे की, फक्त दोन लाख टनांचेच करार आहेत. या दोन लाख टन निर्यातीसाठीच निर्यातदारांना सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन म्हणजेच ही तूर नेमकी कुठे उत्पादीत झाली याची माहीत द्यावी लागेल. यापेक्षा अधिकच्या तुरीला हे सर्टिफेकट लागू होणार नाही. नेमका हाच मुद्दा घेऊन मोझांबिकमधील निर्यातदाराने कोर्टात धाव घेतली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Kumar Saptarshi Tribute: डॉ. सप्तर्षींचा विचार अखंडपणे जपणे गरजेचेच शरद पवार यांचे आवाहन

Drone Pilot Training MOU: ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ‘वनामकृवि’चा ‘सारथी’सोबत करार

Goat Deformity Case: गौंडगाव येथील बोकडामध्ये दिसली दुर्मीळ नैसर्गिक विकृती; पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञाकंडून तपासणी

Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे

Women Farmers Empowerment Council: राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन

SCROLL FOR NEXT