Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Canning: रत्नागिरीत आंबा कॅनिंगला सुरुवात, किलोला ६० ते ६५ रुपये दर

Mango Price: रत्नागिरीत आंबा उत्पादन कमी असतानाही डागी आंब्यांमुळे कॅनिंग उद्योगाला चालना मिळाली आहे. सध्या कॅनिंगसाठी आंब्यांना किलोला ६० ते ६५ रुपये इतका दर मिळतो आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News: आंबा उत्पादन कमी असल्यामुळे कॅनिंग व्यवसायाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणातील बदलांमुळे डागी आंब्यांचे प्रमाण वाढले आहे. या आंब्याला बाजारात दर मिळत नाहीत. त्यामुळे अनेक बागायतदारांनी अशी फळे कॅनिंगला देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात कॅनिंगने आंबा खरेदी सुरू झाली आहे. सुरुवातीलाच किलोला ६० ते ६५ रुपये दर मिळत आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे बाजारामध्ये चांगला दर मिळत आहे. गेले काही दिवस दर स्थिर राहिल्यामुळे सुरुवातीला आंबा बागायतदार समाधानी होते. सध्या बाजारातील दर साडेतीन ते चार हजार रुपयांपर्यंत आहेत. उत्पादन कमी असल्याने यावर्षी मे महिन्यापूर्वीच आंबा हंगाम संपण्याची शक्यता आहे.

कमी उत्पन्न असल्यामुळे किलोला दर चांगला मिळेल, अशी सध्याची स्थिती आहे. डागी आंबा कॅनिंगला टाकला जात असून, त्यालाही बाजारात ६० ते ६५ रुपये किलो दर मिळत आहे. हा दर कायमस्वरूपी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, आंब्याचे उत्पादन कमी असल्याने हा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे.

ज्यांच्या बागेमध्ये आंबा आहे त्यांना चांगले दिवस आहेत. तसेच उत्पादन कमी असलेल्यांना यंदाचा हंगाम अडचणीचा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी पावस परिसरात किलोवर आंबा विकण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी किलोचा आंबा घेण्यासाठी बाहेरील व्यापारीही दाखल होतात; मात्र या वर्षी आंब्याचे उत्पादन कमी असल्यामुळे अद्याप बाहेरून किलोचा आंबा घेण्यासाठी व्यापारी फिरकलेले नाहीत.

याबाबत पावस येथील ‘साई मॅंगो सप्लायर’चे प्रवीण शिंदे म्हणाले, की कॅनिंगसाठीचा आंबा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे किलोचे दर चढेच राहतील. सध्या स्थानिक कॅनिंग व्यावसायिकच आंबा खरेदी करीत आहेत. त्यांना दरवर्षी प्रक्रियेसाठी माल आवश्यक असतो. ते आताच खरेदी करीत आहेत. परराज्यात किंवा परजिल्ह्यात कॅनिंगसाठी आंबे नेणारे व्यापारी अद्याप आलेले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT