Mango Import  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Import : अमरावती बाजारात आंबा आवक १३०० क्‍विंटलवर

Amravati Mango Market : स्थानिक फळ व बाजार समितीत आंबा आवक कमी होण्याची नाव घेत नसून सध्या ती विक्रमी १३०० क्‍विंटलवर पोहोचली आहे.

Team Agrowon

Amravati News : स्थानिक फळ व बाजार समितीत आंबा आवक कमी होण्याची नाव घेत नसून सध्या ती विक्रमी १३०० क्‍विंटलवर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४२० क्विंटल आवक ही नीलम जातीच्या आंब्याची असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

अमरावती बाजार समितीत सद्यःस्थितीत दशहरी आंब्याची ३७० क्विंटलची आवक होत आहे. याला ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. याच वेळी तोतापुरी आंब्याची २४० क्विंटलची आवक असून, ३००० ते ३५०० याप्रमाणे याचे व्यवहार होत आहेत.

बाजारात सर्वाधिक ४२० क्विंटल नीलम जातीच्या आंब्याची आवक होत आहे. तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये असा दर याला मिळत आहे. १५० क्विंटल इतकी कैरीची आवक होती. सध्या कैरीच्या दरात तेजी आहे.

३००० ते ५००० रुपये प्रमाणे कैरीचे व्यवहार होत आहेत. २५०० ते ३००० या दराने स्थानिक मख्खन जातीच्या आंब्याची विक्री होत असून याची आवक १२० क्विंटल इतकी होती. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दशेहरी आंब्याची रोज आवक सरासरी ३७० क्‍विंटल होती. याचे दर ३५०० ते ४२०० रुपये क्‍विंटल राहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT