Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Export : मक्याच्या निर्यातीत ५८ टक्क्यां‍नी घट

Maize Market : यंदा मक्याच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत यंदा (२०२३-२४) मक्याची निर्यात तब्बल ५८ टक्क्यांनी कमी झाली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदा मक्याच्या निर्यातीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत यंदा (२०२३-२४) मक्याची निर्यात तब्बल ५८ टक्क्यांनी कमी झाली आहे. स्‍थानिक बाजारात मक्याच्या वाढत्या किमती, पिकाचे घटलेले उत्पादन व इथेनॉल, पोल्ट्री आणि स्टार्च उत्पादकांकडून देशांतर्गत बाजारातच मक्याला सातत्याने मागणी राहिली यामुळे मक्याच्या निर्यातीत घट झाल्याचे चित्र आहे.

भारताकडून मका खरेदी करणे महाग पडत असल्याने बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या प्रमुख खरेदीदार देशांनी इतर ठिकाणांहून मका खरेदी करण्यास प्राधान्य दिले यामुळे मक्याच्या निर्यातीवर मर्यादा आल्या. गेल्या वर्षी मक्याची निर्यात ३४.५३ लाख टन इतकी होती. यंदा ती तब्बल १४.४२ लाख टनांवर घसरली आहे.

गेल्या वर्षी मक्याच्या निर्यातीतून भारताला ८९८७ कोटी रुपये मिळाले होते. यंदा ही रक्कम ३६६० कोटींपर्यंत घसरली आहे. निर्यातीची घट ही प्रामुख्याने बांगलादेशमुळे झाली. बांगलादेशने गेल्या वर्षी १७ लाख टन मका निर्यात केली होती.

यंदा ती तब्‍बल ८८ टक्यांनी घटून केवळ २ लाख टनांवर आली. जागतिक बाजारातील दराच्या तुलनेत भारताकडून मका खरेदी महाग पडत असल्याचे कारण देत अन्य देशांनी भारतीय मक्याकडे काणाडोळा केला, यामुळेच मका निर्यातीत मोठी घसरण झाली आहे.

उत्‍पादन घटीचाही फटका

देशात २०२२-२३ ला मक्याचे उत्पादन ३८० लाख टन झाले होते. २०२३-२४ मध्ये हे प्रमाण ३२४ लाख टनांपर्यंत कमी आले. २-२३-२४ मध्ये खरीप मका उत्पादन मागील वर्षीच्या २३६.७४ लाख टनांच्या तुलनेत २२७ लाख टनांवर घसरले आहे.

तर रब्बी हंगामातील उत्पादन मागील वर्षीच्या ११६.९ लाख टनांच्या तुलनेत ९७.५० लाख टनापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. कोरड्या हवामानाची परिस्थिती आणि ‘एल निनो’च्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अनियमित पावसाचा विपरित परिणाम कर्नाटक आणि बिहारसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मका पिकाच्या उत्पादनावर झाला.

यंदाच्या हंगामाकडे लक्ष

मक्याला देशभरातून सातत्याने मागणी वाढत आहे. देशांत धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पांची संख्या वाढण्याअगोदर मक्याचा वापर पशुखाद्य, निर्मितीसाठी होत होता. स्टार्च, पोल्ट्री उद्योगांकडूनही मागणी होती. केंद्राने मक्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पांना प्रोत्साहन दिले यामुळे मागणीत मोठी वाढ झाली.

पण त्‍या तुलनेत मक्याचे उत्‍पादन कमी होत असल्याचे चित्र आहे. येत्या खरिपासून केंद्राने देशभरातील मका संशोधन केंद्राच्या माध्यमातून मक्‍याची लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यंदा जर पावसाने चांगली साथ दिली तर मक्याचे उत्‍पादन खरिपात वाढू शकते. पण त्यासाठी शेतकऱ्यांना मका पेरणीसाठी जादा प्रोत्साहित करावे लागणार असल्याची माहिती या उद्योगातील तज्‍ज्ञांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kidney Sale Case: एकोणीस शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या

Agri Crop Damage: लातूर जिल्ह्यात चौदा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Papaya Price: खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत

Land Acquisition Dispute: दमदाटी करून जमिनी का घेता?

Maharashtra Rain Forecast: यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT