Mahanand Milk  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mahanand Milk : दूधपुरवठ्याअभावी ‘महानंद’ला घरघर

महानंदचे दूध संकलन होत नसल्याने कर्मचारी, प्रकल्प क्षमतेचा पुरेपूर वापर होत नसल्याचे वार्षिक अहवालात ताशेरे ओढले होते. तसेच महानंदच्या एकूण संपत्तीचे मोजमापही होत नसल्याची गंभीर बाब अहवालात लेखापरीक्षकांनी नमूद केली होती.

Team Agrowon

बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Mumbai News : ‘महानंद’च्या (Mahanand Milk) उपविधीप्रमाणे सदस्य संघांकडून त्याच्या संकलनाच्या पाच टक्के दूधपुरवठा (Milk Supply) केला जात नसल्याने महासंघाच्या दूध संकलनात घट झाली आहे.

परिणामी टेट्रा पॅक प्रकल्प (Tetra Pack Project) सज्ज असूनही दुधाअभावी सैन्य दलाला दूधपुरवठा करण्याचा ठेका रद्द झाल्याची कबुली पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

महानंदचे दूध संकलन होत नसल्याने कर्मचारी, प्रकल्प क्षमतेचा पुरेपूर वापर होत नसल्याचे वार्षिक अहवालात ताशेरे ओढले होते. तसेच महानंदच्या एकूण संपत्तीचे मोजमापही होत नसल्याची गंभीर बाब अहवालात लेखापरीक्षकांनी नमूद केली होती.

महानंदवर ओढवलेल्या या संकटाबाबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रकाश सुर्वे यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता.

या प्रश्‍नाला दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी उत्तर दिले. ‘ॲग्रोवन’ने महानंदला लागलेली अखेरची घरघर आणि कामकाजातील गंभीर त्रुटींबाबत वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता.

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची दैनंदिन दूध संकलन क्षमता १० लाख लिटर असतानाही ती ८० हजार लिटरवर आली आहे.

दूध पावडर, बटर प्रकल्प पुरेशा दुधाअभावी बंद असून, महानंद प्रकल्प बंद होण्याच्या स्थितीत आहे.

नागपूर, पुणे, लातूर आणि कडेपूर येथील दूध संकलन प्रकल्प १५ टक्के क्षमतेने सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देण्याची आर्थिक क्षमता महानंदकडे राहिली नाही.

गोरेगाव येथे महानंदच्या एक लाख लिटर क्षमतेच्या अत्याधुनिक टेट्रा प्रकल्प तयार आहे पण या प्रकल्पासाठी दूधच मिळत नसल्याने सैन्य दलाला रोज दूध पुरवठा करण्याचा मिळालेला ठेकाही रद्द झाला आहे.

परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नियंत्रण महानंदमार्फत केल्यास राज्यात विविध शासकीय योजनांमार्फत आणि विविध ठिकाणी दुधाचा पुरवठा महानंदमार्फत केल्यास महानंदची आर्थिक क्षमता वाढू शकते.

तसेच गावोगावी दूध संघाची केंद्रे सुरू करावीत अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत आहे. यावर सरकारने काय कार्यवाही केली,असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले.

यावर दिलेल्या लेखी उत्तरात महानंदला अखेरची घरघर लागल्याची कबुली मंत्री विखे पाटील यांनी दिली.

महासंघाच्या उपविधीनुसार सदस्य संघाकडून त्याच्या संकलनाच्या पाच टक्के दूधपुरवठा महासंघास केला जात नसल्यामुळे महासंघाच्या दूध संकलनात घट झाली आहे.

परिणामी, गोरेगाव येथील महानंदच्या ट्रेटा पॅकसाठी दूध मिळत नसल्याने सैन्य दलाला दूधपुरवठा करण्याचा ठेका रद्द झाला आहे.

ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न सुरू

दूध पुरवठ्याअभावी महासंघाची प्रकल्प क्षमता, कर्मचारी यंत्रणेचा पुरेपूर वापर होत नसल्यामुळे महासंघाची आर्थिक स्थिती ढासळली आहे.

महानंदची खालावलेली आर्थिक स्थिती व त्याअनुषंगाने कराव्यांच्या उपाययोजनेसंदर्भात महासंघास ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाबरोबर चर्चा सुरू असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT