Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Kheda Kharedi : खानदेशात कापूस खेडा खरेदीस कमी प्रतिसाद

खानदेशात कापसाच्या खेडा खरेदीला (जागेवर किंवा थेट खरेदी) कमी प्रतिसाद मिळत आहे.

Team Agrowon

Cotton Market जळगाव ः खानदेशात कापसाच्या खेडा खरेदीला (जागेवर किंवा थेट खरेदी) कमी प्रतिसाद मिळत आहे. दर ७८०० ते ८१०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.

गुजरातमधील कारखानदारांकडून धुळे व नंदुरबार भागात खरेदी सुरू आहे. काही शेतकरी कापसाची विक्री करीत आहेत. परंतु साठविलेल्या कापसाची एकाच वेळी पूर्ण विक्री टाळत आहेत.

खानदेशात दरवर्षी २५ ते २७ लाख कापूस गाठींचे उत्पादन जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांत केले जाते. परंतु कारखाने कोविडनंतर फारसे सुरू नाहीत. त्यातच तेजीत कारखाने बंद असतात व मंदीमध्ये सुरू असतात, असेही चित्र आहे.

खानदेशात गुजरातमधील कारखानदार, मोठे खरेदीदार एजंटच्या मदतीने कापूस खरेदी करतात. परंतु यंदा बाजार अस्थिर असल्याने गुजरातमधील खरेदी फक्त धुळ्यापर्यंतच केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यात काही स्थानिक कारखानदार, व्यापारी एजंटच्या मदतीने कापूस खरेदी करीत आहेत. खानदेशातील बाजारांत कापसाची ४० टक्के आवक झाली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. जळगाव जिल्ह्यातही नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या निम्म्या कापसाची विक्री केली आहे.

परंतु डिसेंबरच्या मध्यानंतर कापूस विक्री फारशी शेतकऱ्यांनी केलेली नाही. कारण दर ७८०० ते ८०००, तर सर्वसाधारण ८२५० रुपये प्रतिक्विंटल राहिले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार किमान १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर अपेक्षित आहे.

कापूस प्रक्रिया मंद गतीने

अनेक खरेदीदारही मंदीचे कारण सांगून आपले कारखाने निम्म्याच क्षमतेने सुरू ठेवत आहेत. यामुळे कापूस प्रक्रियाही मंद गतीने सुरू आहे. परिणामी खेडा खरेदीदेखील रखडत सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT