Soybean Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनांची दूरवर रांग

Soybean Market : शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या असून वेळेवर माप व्हावे, यासाठी गर्दी वाढत असल्याचे दिसते आहे.

Team Agrowon

Beed News : येथील शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या असून वेळेवर माप व्हावे, यासाठी गर्दी वाढत असल्याचे दिसते आहे. मात्र, चालकाकडून कसल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत बसण्याची वेळ येत आहे.

तालुक्यातील हरभरा, सोयाबीन व इतर धान्य उत्पादक शेतकऱ्यांकरीता एकच शासकीय खरेदी केंद्र आहे. तसेच एकच केंद्र आणि त्यातही बारदाण्याअभावी अथवा इतर कारणांमुळे नेहमीच बंद असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

नोंदणी करून महिना उलटला तरी देखील मॅसेज येत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. धान्य मोजण्यासाठी एकच काटा असल्याने मापासाठी तासन् तास ताटकळत बसावे लागत आहे.

शेतकऱ्यांना इतर कामे सोडून शासकीय खरेदी केंद्रावर मुक्काम करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. दरम्यान, बारदाण्याअभावी बंद असलेले खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी शेतकऱ्यांनी केली होती.

याठिकाणी कसलीही सोय नसून पिण्यासाठी पाणी, उन्हापासून बचावासाठी निवारा नसल्याने मात्र शेतकऱ्यांची फरफट होत आहे. केंद्र चालकांकडून मात्र कसल्याही उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.

यामुळे झाली गर्दी

शासकीय सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीची मुदत होती. ही मुदत वाढवुन ६ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना एकदम मॅसेज पाठविण्यात आले असून त्यामुळे याठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT