Wheat Export Letter Of Credit
Wheat Export Letter Of Credit Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

‘एलसी’ पूर्ण केलेला गहू निर्यात होण्याची शक्यता?

टीम ॲग्रोवन

१३ मे रोजी केंद्र सरकारने गहू निर्यातबंदीचा (Wheat Export Ban) निर्णय घेतला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) (Letter Of Credit) म्हणजेच निर्यातबंदी पूर्वीच ज्या व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्ण केले आहेत, त्यांना करारानुसार निर्यातीस सूट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. एलसी अंतर्गत सूट दिली गेली तर पहिल्या टप्प्यात १ दशलक्ष टन गहू निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक बाजारपेठेत गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या तुटवड्याला प्रामुख्याने रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी आहे.

१३ मे रोजी केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादनात घट असल्याने वाढत्या महागाईला रोखण्यासाठी गव्हाची निर्यात बंद केली. आता निर्यात करण्यात येणाऱ्या गव्हापैकी अर्धा गहू हा बांग्लादेशला निर्यात करण्यात येण्याची शक्यता आहे.

यातील बहुतांश गहू हा रस्त्याने तर काही गहू हा जहाजाद्वारे पाठवला जाऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. “बांग्लादेशची साठवण क्षमता कमी असल्याने भारतीय गहू आयात करण्याची त्यांना घाई नाही. बांग्लादेशला गहू आयात करायचा असेल तर त्यांच्या गोदामातील तांदूळ विकावा लागेल,” असे निर्यातदारांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT