Lemon Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Lemon Market : आवक मंदावल्याने कळमनात लिंबू दर तेजीत

Lemon Rate : मॉन्सूनोत्तर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे अवेळी ताण तुटल्याने लिंबांचा हंगाम लांबला आहे. त्यामुळे कळमना बाजारात लिंबाच्या दरात चांगलीच तेजी आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : मॉन्सूनोत्तर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे अवेळी ताण तुटल्याने लिंबांचा हंगाम लांबला आहे. त्यामुळे कळमना बाजारात लिंबाच्या दरात चांगलीच तेजी आली आहे. हे दर तब्बल ८५०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. एप्रिलपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. नजीकच्या काळात दर १० हजार रुपयांवर पोचतील, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यात सुमारे २५० हेक्‍टरवर लिंबांची लागवड आहे. त्यातील सर्वाधिक ८० हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या नांदगाव खंडेश्‍वरमधील माऊली (चोर) परिसरात असल्याचे सांगण्यात येते. या भागातून विदर्भातील प्रमुख बाजारात लिंबांचा पुरवठा होतो. तसेच अकोला जिल्ह्यातील वाडेगाव भागातही लिंबांच्या बागा आहेत.

ही दोन गावेच लिंबाचे प्रमुख उत्पादक आणि पुरवठादार आहेत. आंबिया आणि हस्त बहारातील लिंबू फळांची उपलब्धता फेब्रुवारीपासून होते. परंतु यंदा नोव्हेंबरमध्ये झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाच्या परिणामी हा हंगाम लांबला. या हंगामातील लिंबू फळे आता थेट एप्रिलमध्ये उपलब्ध होतील, अशी माहिती लिंबू बागायतदार अंकुश झंझाट यांनी दिली.

दरम्यान, तापमानात वाढ झाल्याने ग्राहकांकडून लिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळेच बाजारात लिंबांचे दर चांगलेच तेजीत आले आहेत. महिन्याच्या सुरुवातीला ४००० ते ६००० रुपयांचा दर लिंबाला असताना आता हे दर थेट ८५०० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. किरकोळ बाजारात तर यापेक्षा अधिक दराने लिंबू विकले जात आहे. सरासरी १०० रुपये किलोने लिंबू फळांचे व्यवहार होत असल्याचे झंझाट यांनी सांगितले.

बाजारात आवक अत्यल्प

नागपूरच्या कळमना बाजारात सद्यःस्थितीत १२ क्‍विंटल इतकी अत्यल्प आवक आहे. या ठिकाणी दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. ७००० ते ७५०० आणि त्यानंतर ८००० ते ८५०० अशी झेप लिंबू दराने या ठिकाणी घेतली आहे.

मॉन्सूनोत्तर पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वातावरणातील बदलाचा फटका बसत लिंबाचा हंगाम लांबला आहे. आंबिया, हस्त बहारातील फळे यंदा एप्रिलमध्ये मिळतील. तापमान वाढल्याने लिंबाला मागणी वाढली आहे. परिणामी दर वाढले आहेत. सरासरी ८५०० रुपये क्‍विंटलप्रमाणे घाऊक व्यवहार होत आहेत. किरकोळ दर १०० ते १२० रुपये किलो आहेत. येत्या काळात दरात आणखी तेजी येऊ शकते.
- अंकुश झंझाट, लिंबू बागायतदार, माऊली (चोर), अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT