Kanat Fish Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Fish Market : मच्छीमारांना ‘कानट’ माशाचा आधार

Kanat Fish : मागील आठवड्यात मच्छीमारांच्या जाळ्यात सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणात कानट मासा सापडल्यामुळे दिलासा मिळाला; मात्र वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्याने मासळी खोल पाण्यात गेली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : मागील आठवड्यात मच्छीमारांच्या जाळ्यात सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणात कानट मासा सापडल्यामुळे दिलासा मिळाला; मात्र वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्याने मासळी खोल पाण्यात गेली आहे. ती परतण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

ऑगस्टमध्ये ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला आरंभ झाला. त्यानंतर महिनाभरात शासनाच्या निर्देशानुसार पर्ससिननेट मासेमारी सुरू झाल्यानंतर आरंभीलाच किनाऱ्यापासून २० ते २२ वाव खोल समुद्रात जाळ्यात कानट मासा मिळू लागला. दरवर्षी सुरुवातीच्या कालावधीत हा मासा मिळतो. साधारपणे ४ सप्टेंबरपासून हा मासा सापडण्यास सुरुवात झाली होती. पुढे सलग तीन दिवस नौकांना कानट मासा मिळत होता.

फिशमिल कंपन्यांमध्ये सुरुवातीला किलोला २२ रुपये दर मिळाला. पुरवठा वाढल्यामुळे हा दर निम्म्यावर आला. सध्या दहा ते बारा रुपये किलोने फिशमिल कंपनीत हा मासा विकत घेतला जात आहे. या माशांवर प्रक्रिया करून त्यापासून बनवलेले ऑईल किंवा पावडर निर्यात केली जाते. त्याला परदेशामध्ये मागणी आहे.

दरम्यान, फिशमिल कंपन्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक मासा प्रक्रियेसाठी येऊ लागला. त्यानंतर काही कालावधीतच कंपन्यांनी खरेदी बंद केली होती. तीन दिवसांनंतर कानट मिळण्याचा ओघ कमी झाला आहे.

सध्या पाचशे ते हजार किलोपर्यंतच मासा मिळत आहे. त्यामुळे कंपन्यांची खरेदीही सुरू झाली आहे; परंतु ८ सप्टेंबरला वेगवान वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला आणि मासेमारी थांबली. सोमवारपासून (ता. ११) मच्छीमार समुद्रात जाऊ लागले आहेत. पण अपेक्षित मासे जाळ्यात सापडत नसल्यामुळे मच्छीमारांची निराशा होत आहे.

कानट मासा मोठ्या प्रमाणात पकडला गेल्याने त्यावर अवलंबून असलेले अन्य मोठे मासे जिल्ह्याच्या किनारी भागात येणे अशक्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मासे पकडले जाणे भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते.
- अप्पा वांदरकर, मच्छीमार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT