Banana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : खानदेशात केळी दरात सुधारणांचा कल; कमाल दर १८०० रुपयांवर!

Banana Market Update : केळीच्या दरात खानदेशात सकारात्मक सुधारणा दिसत असून, सध्या त्याचे कमाल दर १८०० रुपये प्रति पेटीपर्यंत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब असून, उत्पादन विक्रीला चांगला फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : केळी दरात सुधारणांचा कल खानदेशात कायम आहे. प्रतिक्विंटल कमाल दर १२०० ते १३०० रुपयांवरून १८०० रुपये दर, असे मागील १८ ते २० दिवसांतील स्थिती आहे. केळीस उठाव आहे, पण आवक मात्र कमी आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीतील दर व लिलाव यानुसार केळीचे दर खानदेशात खेडा किंवा थेट खरेदीत निश्चित केले जातात. बऱ्हाणपूर बाजार समितीत केळी दरात सतत वाढ दिसत आहे. तेथे रविवारी (ता.१९) केळीस प्रतिक्विंटल १००१ व कमाल १८०१ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

तर सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर तेथे होता. किमान दरात तेथेही सतत वाढ झाली आहे. तेथे केळी आवक अजूनही नीचांकी स्थितीत असून, मागील आठ ते १० दिवसांपासून प्रतिदिन सरासरी १० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) केळीची आवक झाली आहे.

खानदेशात सध्या पिलबाग केळीमधून आवक होत असून, प्रतिदिन सरासरी ४५ ट्रक एवढी आवक (एक ट्रक १६ टन क्षमता) मागील १० ते १२ दिवसांत झाली आहे. केळीस कुंभ मेळ्यानिमित्त उठाव आहे. यामुळे केळी दरात सतत वाढ झाली आहे. यात आवक कमी आहे. पिलबाग केळीमधूनही दर्जेदार केळीची आवक सध्या होत आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांत केळीची आवक आहे. आवकेत पुढील महिन्यात किंवा ३० ते ३५ दिवसांनंतर चांगली वाढ होईल, असे संकेत आहेत.

केळीचे दर मागील महिन्यात खानदेशात प्रतिक्विंटल सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केळी दर सरासरी १३०० रुपये प्रतिक्विंटल, असे राहिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Fraud: ‘कृषी’च्या ड्रम घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

Urea Hoarding Case: युरियाची साठेबाजी उघड; दोन कृषी केंद्रांवर कारवाई

Mini Tractor Distribution: लोहीग्राममध्ये समाधान शिबिरात मिनी ट्रॅक्टरचे वाटप

Farmer Dispute Resolve: पोलिस आता रात्रीच्या वेळीही शेतकऱ्यांच्या बांधावर

Lemon Mosambi Procurement: ‘नाफेड’तर्फे लिंबू, मोसंबी खरेदी करावी: शेतकरी सहकारी संघ

SCROLL FOR NEXT