Watermelon Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

watermelon Market : खानदेशात कलिंगड आवक कमी, दर स्थिर

Khandesh Fruit Market : खानदेशात सध्या कलिंगडाची आवक अल्प आहे. आवक कमी असल्याने दर टिकून आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात सध्या कलिंगडाची आवक अल्प आहे. आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. शेतकऱ्यांना जागेवर प्रतिकिलो २० ते २२ रुपये दर मिळत आहे. कलिंगडाची लागवड यंदा खानदेशात ३५ टक्के घटली आहे. मागील हंगामात पिकात रोगराई आली. त्यामुळे अतोनात हानी झाली.

एक ते दीड महिन्याचे पीक ऐन फळे लगडल्याच्या काळात हातचे गेले. कलिंगडाचा एकरी खर्च ६५ ते ७० हजार रुपये आहे. एवढा खर्च अनेकांचा वाया गेला. यामुळे अनेकांनी यंदा लागवड टाळली आहे. सतत दोन-तीन वर्षे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा लागवड टाळली आहे. तर काही नवख्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

यंदा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येही लागवड झाली नाही. तसेच डिसेंबरमध्येही अनेकांनी लागवड टाळली. यामुळे या महिन्यात किंवा डिसेंबरमध्येही कलिंगडाची खानदेशात आवक नव्हती. मागील महिन्याच्या अखेरीस लागवड झाली आहे. परंतु ही लागवडदेखील कमी आहे. पुढेही फारशी आवक राहणार नाही.

मागील वर्षी डिसेंबर, जानेवारीत मिळून सुमारे ९०० हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली होती. लागवडीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील तळोदा व शहादा तालुका आघाडीवर होता.

यंदा मात्र सर्वत्र लागवड घटली आहे. सुमारे ६५० हेक्टरवर ही लागवड झाली आहे. काही शेतकरी सध्या लागवड करीत आहेत. परंतु ही लागवडदेखील फारशी होणार नाही, अशी स्थिती आहे.

‘रमजान’च्या दृष्टीने नियोजन

अनेकांनी रमजान महिन्यातील मागणी लक्षात घेऊन मागील महिन्यात लागवड केली आहे. कमाल शेतकऱ्यांनी रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून घेऊन लागवड पूर्ण केली आहे. तर काहींनी थेट बियांची टोकन पद्धतीने लागवड केली आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. रोपांची मागील महिन्यात लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकास फळे लगडू लागली आहेत. त्यात खते व फवारणीचे नियोजन केले जात आहे.

खरेदीदार थेट शिवारात

सध्या खानदेशात कलिंगडाची आवक प्रतिदिन १०० टन एवढीदेखील नाही. यामुळे दर टिकून आहेत. खरेदीदार थेट शिवारात जाऊन पाहणी करीत आहेत. शेतकऱ्यांशी संपर्क साधून विक्रीचे नियोजन व दराची अपेक्षा जाणून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT