Kabuli Chana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Cultivation News : यंदा काबुली हरभऱ्याची लागवड वाढण्याची शक्यता

Kabuli Chana News : हरभऱ्याला गेले काही महिने फारसा दर मिळत नसल्याने यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात शेतकरी काबुली हरभरा लागवडीला प्राधान्य देण्याची शक्यता वाढली आहे.

Team Agrowon

Buldana News : हरभऱ्याला गेले काही महिने फारसा दर मिळत नसल्याने यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात शेतकरी काबुली हरभरा लागवडीला प्राधान्य देण्याची शक्यता वाढली आहे. काबुली हरभरा विक्रीला आला तेव्हा सुरवातच ९३०० रुपयांपासून झाली होती. सध्या बाजारात हा हरभरा १४ हजार रुपये क्विंटलपर्यंत विक्री होत आहे.

रब्बी हंगामात हरभरा हेच प्रमुख पीक झालेले आहे. जिल्ह्यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक लागवड राहते. यावर्षी कमी पावसामुळे रब्बीचे क्षेत्र नेमके किती होईल, हे अद्याप निश्‍चित सांगता येत नाही.

पुढील काळात एक-दोनवेळा पाऊस झाला तर रब्बी पिकांची लागवड हमखास होईल. यावर्षी घाटावरील भागात प्रामुख्याने काबुली हरभऱ्याची लागवड करण्याकडे कल दिसून येत आहे.

मर रोगामुळे या हरभऱ्याच्या लागवडीकडे मागील काही वर्षात मोठी घट झाली होती. आता पुन्हा शेतकरी या हरभऱ्याकडे वळू लागले आहेत. जिल्ह्यात मराठवाड्याला लागून असलेल्या धाड सर्कलमध्ये हा हरभरा मोठ्या क्षेत्रावर पेरला जातो. जिल्ह्यात मेहकर, लोणार, चिखली या तालुक्यांमध्येही प्रयोगशील शेतकरी काही प्रमाणात काबुली हरभऱ्याची लागवड करीत असतात. हरभऱ्याचे

दर गेले वर्षभर दबावातच राहिलेले आहेत. सध्या बाजारपेठांमध्ये हरभरा सरासरी ५००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल विकत आहे. तर दुसरीकडे काबुली हरभरा कमाल १४२०० ते १४८०० पर्यंत विकत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. यावर्षी लागवड वाढू शकते. मात्र, कमी पावसाने चिंता निर्माण केल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मागील हंगामात सात एकरांत काबुली हरभरा लावला होता. एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. या हरभऱ्यात मर रोगाची लागण अधिक राहते. यासाठी लागवडीवेळी बीजप्रक्रिया व नंतरही बुरशीनाशकांचा वापर करीत रोग आटोक्यात ठेवला. असे व्यवस्थापन करीत बरेच शेतकरी आता काबुली पिकविण्यात यशस्वी होऊ लागले आहेत. यंदा सातत्याने चांगला दर मिळाल्याने शेतकरी लागवड वाढवतील.
- राजेंद्र बैरागी, शेतकरी, धाड, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT