Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : कर्नाटकातून गुळाची आवक मंदावली

Jaggery Rate : सध्या गुळाला प्रतिक्विंटल ३८०० ते ४००० रुपये दर मिळत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : येथील बाजार समितीत कर्नाटकातील गुळाची वर्षभर आवक असते. गुळाला मागणी कमी असल्याने कर्नाटकातून गुळाची आवक मंदावली आहे. सध्या गुळाला प्रतिक्विंटल ३८०० ते ४००० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून गुळाचे दर टिकून आहेत. येत्या काळात हे दर टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

सांगली बाजार समिती ही हळदी प्रमाणेच गुळासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील शेतकरी येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गुळाची विक्री करण्यासाठी येतात. येथील गूळ गुजरातसह अन्य राज्यांत जातो. कर्नाटकातून दर्जेदार गूळ बाजारात येत असल्याने त्यास राज्यात वर्षभर मागणी असते.

त्यानुसार तिथला शेतकरी गूळ उत्पादनाचे नियोजन करतो. यंदाच्या गूळ हंगामात संक्रांतीपर्यंत गुळाचे दर समाधानकारक होते. डिसेंबर व जानेवारीत गुळाची आवक आणि दर तेजीत होते.

व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठी थोडा थोडा माल खरेदी केला. त्यानंतर बाजारपेठेत गुळाची मागणी कमी झाल्याने फारसा उठाव होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्नाटकातील शेतकरी गूळ विक्रीसाठी पुढे येत नाहीत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्यावर्षी गुळाचे दर सातत्याने कमी अधिक होत होते. त्यातच उत्पादन खर्च वाढला आहे. पाण्याची टंचाई या साऱ्याचा फटका गूळ उद्योगाला बसला आहे. त्यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनाकडे काहीशी पाठ फिरवली आहे.

फेब्रुवारीपर्यंत गुळाची आवक चांगली होती. मार्चपासून आवक हळू हळू कमी झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात गुळाची आवक मंदावली आहे. बाजारपेठेत जितकी मागणी आहे तितक्याच गूळ खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे गुळाचे दर टिकून आहेत.

गूळ निर्मितीचा खर्च वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटकातून गुळाची आवक कमी आहे. फेब्रुवारीपर्यंत गुळाचे दर चांगले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून दर टिकून आहेत.
- अमरसिंह देसाई, गूळ व्यापारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT