Eggs Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Eggs Midday Meal : पोषण आहारात अंड्यांचा समावेश शक्‍य आहे का?

Egg Production : राज्यात सुमारे ९ लाख पोल्ट्री व्यावसायिक आहेत. त्यातील बहुतांश पोल्ट्री व्यावसायिकांकडून लेअर कुक्‍कुटपालनातून अंडी उत्पादनावर भर दिला जातो.

Team Agrowon

Nagpur News : आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या निवासी शाळा, वसतिगृहांमध्ये पोषण आहाराअंतर्गत अंड्यांचा पुरवठा करता येऊ शकतो का? याबाबत आवश्‍यक ती माहिती देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र पशुसंवर्धन आयुक्‍त डॉ. हेमंत वसेकर यांनी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्‍तांना लिहिले आहे.

राज्यात सुमारे ९ लाख पोल्ट्री व्यावसायिक आहेत. त्यातील बहुतांश पोल्ट्री व्यावसायिकांकडून लेअर कुक्‍कुटपालनातून अंडी उत्पादनावर भर दिला जातो. मात्र राज्यात मागणीच्या तुलनेत अंडी उत्पादन कमी असताना इतर राज्यांतून होणाऱ्या अंड्यांच्या पुरवठ्यामुळे वर्षातील काही महिने दर कोसळतात. उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील लेअर पोल्ट्री व्यावसायिकांना शक्‍य होत नाही.

पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्यांवर मंथन होण्यासाठी राज्यात समन्वय समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीच्या जानेवारी २०२३ पासून आजवर झालेल्या तीन बैठकांमध्ये देखील पोषण आहारात अंड्यांच्या समावेशाच्या मुद्यावर सातत्याने चर्चा झाली. विविध पोषण आहार योजनांमध्ये अंड्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणीदेखील पोल्ट्री व्यावसायिकांमधून सातत्याने होत आहे

त्या पार्श्‍वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध पोषण आहारासंबंधी योजना, आहार घटक तसेच संबंधित योजनेच्या मार्गदर्शक सूचना याची माहिती पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध करून देण्यात यावी.

आवश्‍यकतेनुसार आदिवासी विकास विभागाअंतर्गत पोषण आहारात अंड्यांचा वापर करण्याबाबत योजना सुरू करणे शक्‍य आहे का? याबाबतही आवश्‍यक माहिती देण्यासंबंधी पशुसंवर्धन आयुक्‍तांनी पत्रात म्हटले आहे. आदिवासी विकास विभागाकडून या पत्रावर कोणती कार्यवाही होते हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT