Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bangladesh Instability : बांगलादेशातील अस्थिरता भारतीय कापड उत्पादकांच्या पथ्यावर

Cotton Market : बांगलादेशात वस्त्रोद्योगातील अडचणी देशातील सूतगिरण्यांसह कापड उद्योगाच्या पथ्यावर पडल्याची स्थिती आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : देशात सूतगिरण्यांचे कामकाज मागील महिनाभरात पूर्वपदावर आले आहे. गिरण्यांचा नफाही वाढत असून, कापडासही युरोपसह, अमेरिकेत उठाव आहे. बांगलादेशात वस्त्रोद्योगातील अडचणी देशातील सूतगिरण्यांसह कापड उद्योगाच्या पथ्यावर पडल्याची स्थिती आहे.

बांगलादेश जगातील आघाडीचा सूत व कापड उत्पादक देश आहे. तेथे भारतासह चीनने वस्त्रोद्योगात गुंतवणूक केली आहे. कारण वित्तीयदृष्ट्या कमकुवत देश असल्याने बांगलादेशातील कापड निर्यातही शुल्करहित (ड्युटी फ्री) आहे. बांगलादेशला कापूस प्रक्रियेसाठी १०० ते १२० लाख गाठींची आवश्यकता असते.

जगातील एकूण कापड निर्यातीत बांगलादेशचा वाटा २० ते २२ टक्के आहे. परंतु तेथे अस्थिरता आहे. वस्त्रोद्योग तेथे बंदावस्थेत आहे. यामुळे बांगलादेशातील कापडाची निर्यात, निर्मिती अडचणीत असून, तेथील कापडाचा विविध देशांमधील पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी भारतासह पाकिस्तानच्या कापडासही उठाव आहे.

जगात चीन, भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे प्रमुख कापड, सूत उत्पादक देश आहेत. युरोप, अमेरिका हे कापडाचे मोठे आयातदार आहेत. अमेरिकेसह युरोपात बांगलादेशी कापडास उठाव होता. यात चीन व अमेरिकेतील शीतयुद्धामुळे चीनच्या कापड उद्योगासमोर अडचणी कायम आहेत. या स्थितीत बाजारपेठेत कापडासंबंधी पोकळी दिसत आहे. यात भारताच्या कापडास मागणी येऊ लागली आहे. तसेच देशातही कापडाची मागणी येत असून, देशातील सूतगिरण्या व कापड उद्योग दीड वर्षानंतर पूर्वपदावर आला आहे.

नफा येऊ लागला

सूतगिरण्यांना मध्यंतरी कापडास उठाव नसल्याने अडचणी सहन कराव्या लागल्या. परंतु महिनाभरापासून सूतगिरण्यांमधील कामकाज गतीने व नफ्यात सुरू आहे. एक किलोमागे दोन ते अडीच रुपये नफा सूतासंबंधी गिरण्यांना मिळत आहे. देशातील सूतगिरण्यांत २०, ३४, ४१, ४२ काऊंटच्या सुताचे उत्पादन सुरू आहे. दोन वर्षे तोट्यात असलेल्या सूतगिरण्या अलीकडे नफ्यात येत आहेत. यात राज्यात शासनाने सूतगिरण्यांना प्रतिचाती (स्पींडल) पाच हजार रुपये कर्ज बिनव्याजी दिले आहे. यामुळे सूतगिरण्यांसाठी निधी उभा राहिला आहे, अशी माहिती मिळाली.

रूईस उठाव

युरोप, अमेरिकेतील कापड निर्यात यंदा ख्रिसमस नंतर वाढत असल्याची स्थिती आहे. देशातील सूतगिरण्यांना दर महिन्याला ३० ते ३२ लाख कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) गरज सध्या आहे. एका मोठ्या सूतगिरणीत रोज १५० ते १८० गाठींवर (एक गाठ १७० किलो क्षमता) प्रक्रिया देशात होत आहे. देशात सुमारे ७५२ सूतगिरण्या आहेत. यात महाराष्ट्रात सुमारे ११० गिरण्या सुरू आहेत.

यातील ४०० पेक्षा अधिक गिरण्या तमिळनाडू व लगतच्या भागात आहेत. यातील कमाल गिरण्यांचे कामकाज बऱ्यापैकी क्षमतेने सुरू असून, कापूसगाठींची मागणी दर महिन्याला १६ ते १७ लाख गाठींएवढी राहील, अशी स्थिती आहे. रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने देशातील कापूस सूतगिरण्यांना परवडत आहे. देशात यंदा चार हजार कोटी किलो सुताचे उत्पादन होईल, असाही अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

बांगलादेशात अस्थिरता आहे. तेथील कापड व्यापाराला याचा फटका बसला आहे. यामुळे कापडासंबंधीच्या बाजारात देशात संधी तयार झाली असून, राज्यातील सूतगिरण्या पूर्ववत झाल्या आहेत. तोट्यात काम करणाऱ्या सूतगिरण्या आता नफा मिळवू लागल्या आहेत.
अशोक स्वामी, अध्यक्ष, वस्त्रोद्योग महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT