Sugar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : उन्हाळ्यात कारखानदारांना साखर दरवाढीचा गारवा

अंतिम टप्प्यातील साखर हंगाम आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढल्याने साखरेच्या दरात क्विंटलला सरासरी २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur Market अंतिम टप्प्यातील साखर हंगाम (Sugar Season) आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी (Sugar Demand) वाढल्याने साखरेच्या दरात (Sugar Rate) क्विंटलला सरासरी २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून दबावात असणारा साखरेचा देशांतर्गत दर आता हळूहळू वाढत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात कारखानदार साखर दरवाढीचा गारवा अनुभवत आहेत.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शीतपेय व आइस्क्रीम उद्योगातून सातत्याने साखरेला मागणी वाढत आहे. सणासुदीमुळेही साखरेची मागणी कायम आहे. त्याचा एकत्रित परिणाम साखर दर वाढण्यावर झाला आहे.

सध्या देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्र व कर्नाटक या अन्य साखर उत्पादनातील अग्रेसर कारखाने आता ९० टक्के बंद झाले आहेत. यामुळे अंदाजापेक्षाही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादनात घट आली.

याचा सकारात्मक परिणाम साखर दर वाढण्यावर झाला. बाजारात जादा साखर येणार नाही हे निश्चित झाल्यानंतर साहजिकच देशांतर्गत बाजारात साखरेची टंचाई लक्षात घेऊन व्यापाऱ्याकडून मागणी वाढली. यामुळे दरात वाढ झाली. सध्या सरासरी २०० रुपयांपर्यंत साखरेचे दर वाढले आहेत.ॉ

यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात सुरवातीपासूनच विक्रमी पातळीवर साखरेचे दर वाढले. पण देशांतर्गत बाजारात मात्र मागणी अभावी साखरेचे दर एमएसपी ( किमान विक्री मूल्य) इतकेच म्हणजे ३१०० रुपयापर्यंत होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने दराचा चढता आलेख व त्या तुलनेत चढता आलेख व त्या तुलनेत देशांतर्गत बाजारात नसलेली मागणी असा विरोधाभास गेल्या सहा महिन्यापासून होता. मात्र जसा उन्हाळा तीव्र होत गेला तशी मागणी वाढत असल्याचे चित्र आहे.

दोन महिने दरवाढ कायम राहण्याचा अंदाज

साखर कारखानदारांनी एप्रिलमध्ये विक्री करार वाढीव दराने केले आहेत. आइस्क्रीम व शीतपेय उद्योगाकडून गेल्या सहा महिन्यांपेक्षा एप्रिलमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ आहे. किमान दोन महिने तरी साखरेच्या दरात वाढ कायम राहील, अशी शक्यता साखर उद्योगातील तज्ञांनी व्यक्त केली.

उन्हाळ्यात साखरेला मागणी वाढली. यामुळेच गेल्या पंधरा दिवसांत पहिल्यांदाच साखरेचे दर २०० रुपयापर्यंत वाढले. या दरवाढीने साखर कारखानदारांना आर्थिक दृष्ट्या मदत होईल.
विजय औताडे, साखर तज्ज्ञ.
साखरेचे उत्पादन घटू लागल्याने बाजारात जादा साखर न येण्याची शक्यता वाढली. याचा परिणाम साखर दरवाढीवर झाला. उन्हाळा व सण उत्सवामुळे साखरेला मागणी कायम आहे.
- पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT