Dragon Fruit Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dragon Fruit Market : ड्रॅगन फ्रूटच्या दरात ६० रुपयांची वाढ

Fruit Market Update : ड्रॅगन फ्रूटचा चौथा बहार संपत आला असून आता पाचवा बहार लवकरच सुरु होणार आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : ड्रॅगन फ्रूटचा चौथा बहार संपत आला असून आता पाचवा बहार लवकरच सुरु होणार आहे. ड्रॅगन फ्रूटच्या वाढत्या मागणीमुळे दरातही वाढ होत आहे. गेल्या महिन्यापेक्षा चालु महिन्यात ड्रॅगन फ्रूटच्या दरात प्रति किलोस ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात गतवर्षी १० हजार टन ड्रॅगन फ्रूटची विक्री झाली होती. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यास प्रतिकिलोस १०० ते १६० रुपये दर मिळाला होता. दिवाळीपर्यंत दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले.

कमी खर्चात अपेक्षित दर मिळत असल्याने राज्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढत आहे. यंदा राज्यात कमी पाऊस आणि पोषक वातावरणाच्या अभावामुळे पहिला बहार लांबणीवर पडला. त्यामुळे बाजारात ड्रॅगन फ्रूट एक महिन्यांनी दाखल झाले. सुरुवातीस आवक कमी होती. त्यामुळे सातत्याने दरात चढ-उतार होत होते.

यंदा जुलैमध्ये हंगामाला प्रारंभ झाला. प्रारंभास प्रतिकिलोस ७० ते १०० रुपये दर मिळाला. बाजारात हळू हळू ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे दरही चांगले मिळत आहेत. त्यानंतर आठ ते दहा दिवसांत प्रतिकिलोस १० ते १५ रुपयांनी वाढ होऊ लागली आहे. एका महिन्यात सुमारे प्रति किलोस ५० ते ६० रुपयांनी दर वाढले आहे.

सध्या १२० ते १६० रुपये असा दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा रुपयांनी दर अधिक आहे. यंदाच्या हंगामात शनिवार (ता. ९) अखेर सुमारे ८ ते ९ हजार टनांवर ड्रॅगन फ्रूटची विक्री झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दहा वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे. तीन वर्षांपूर्वी थाई गोल्डन या नवीन वाणाची लागवड केली आहे. यंदापासून काढणी सुरु झाली असून सांगली बाजार समितीत २५० किलो माल विक्रीला घेऊन आलो होतो. सौद्यात त्यास २३० रुपये दर मिळाला.
- महेश आसबे, ड्रॅगन फ्रूट उत्पादक, वासुद अकोला, ता. सांगोला.
यंदा ड्रॅगन फ्रूटला चांगले दर मिळत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १० रुपयांनी दर अधिक आहे. आतापर्यंत सुमारे ८ ते ९ हजार टन ड्रॅगन फ्रूटची विक्री झाली आहे. येत्या पंधरा दिवसानंतर दरात वाढ होईल, अशी आशा आहे.
- संभाजी कोडग, ड्रॅगन फ्रूट उत्पादक, आवंढी, ता. जत, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT