Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

Onion Market : नगर जिल्ह्यात गावरान कांद्याची आवक होत आहे. बाजारात सध्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० ते ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात गावरान कांद्याची आवक होत आहे. बाजारात सध्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० ते ५२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आठ दिवसांपासून साधारण तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजारात सोमवारी, गुरुवारी व शनिवारी कांद्याचे लिलाव होत असतात. ९ सप्टेंबरला ५९ हजार गोण्यांची विक्री होऊन १३०० ते ४३०० रुपये व सरासरी ३६०० रुपये दर मिळाला. तर १२ सप्टेंबर रोजी कांद्याची ४९ हजार गोण्याची नेप्ती बाजारात आवक झाली होती.

त्या वेळी प्रति क्विंटल १२०० ते ४३०० रुपये व सरासरी ३६५० रुपयांचा दर मिळाला. कांद्यावरील निर्यातमूल्य हटवल्यानंतर काही प्रमाणात दर वाढल्याचे पाहायला मिळाले. १४ सप्टेंबरच्या लिलावात मात्र कांदा दरात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्या दिवशी ५० हजार कांदा गोण्याची आवक होऊन एक नंबरच्या कांद्याला ४५०० ते ५३००, दोन नंबरच्या कांद्याला ३७०० ते ४५०० रुपये, ३ नंबरच्या कांद्याला २७०० ते ३७०० व चार नंबरच्या कांद्याला १५०० ते २७०० रुपयांचा दर मिळाला. सरासरी दर हा चार हजारांच्या पुढे होता. या लिलावात १८ गोण्याला ५५००, २० गोण्याला ५४०० व ७ गोण्याला ५३०० रुपये दर मिळाला आहे.

राहुरी बाजार समितीत १७ हजार गोण्याची आवक झाली. १ हजार ते ५ हजार रुपयांचा दर मिळाला. १४ गोण्याला ५ हजार रुपये, ८ गोण्यांना ४९२५ रुपये, ११ गोण्यांना ४८५०, ११ गोण्यांना ४८०० रुपये दर मिळाला आहे. येथे सरासरी ४ हजारांचा दर मिळाला आहे. पारनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव बाजार समितीतही ५ हजारांपर्यंत कांद्याला दर मिळत आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील दर (रुपये/क्विंटलमध्ये)

बाजार समिती---किमान----कमाल----सरासरी

नगर -------२५०० ---५२०० ---४०००

राहुरी-------१०००.... ५०००..४०००

पारनेर------२५०० ----५१००...३९००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: माचीवरला शंकर...

Saptashrungi Devi Darshan: सप्तशृंगीमातेचे मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन

Model Village: भेंड गावानं बांधलं प्रगतीचं, विकासाचं तोरण !

Agrowon Diwali Article: अवघाचि संसार सुखाचा करीन

NITI Aayog: देशातील समुद्री मासेमारीच्या विकासासाठी नीती आयोगाचा अहवाल; स्वतंत्र योजना आणि धोरणांची शिफारस

SCROLL FOR NEXT