Ethanol Production
Ethanol Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane FRP : कर्नाटकात ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’सोबत इथेनॉल विक्रीचाही लाभ

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : कर्नाटकात यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’शिवाय (Sugarcane FRP) इथेनॉल विक्रीतून (Ethanol Sale) येणारी रकमेचाही लाभ मिळणार आहे. ‘एफआरपी’च्या रकमेव्यतिरिक्त प्रति टन ५० रुपये याप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. ‘एफआरपी’शिवाय इथेनॉलचा (Ethanol Production) लाभ देण्याचा राज्याच्या साखर इतिहासातील हा पहिला निर्णय असल्याची माहिती कर्नाटकचे साखरमंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी बंगळूर येथे दिली.

या रकमेमुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना ‘एफआरपी’शिवाय २०४ कोटी रुपये अधिकचे मिळणार आहेत. केंद्राची ‘एफआरपी’ व इथेनॉलचा अधिकचा दर असे मिळून कर्नाटकातील शेतकऱ्यांना ३१०० रुपये प्रति टनापर्यंत दर मिळू शकेल, असे श्री. मुनेनकोप्पा यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून जादा ऊसदरासाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर साखर कारखान्यांचे उप-उत्पादनांद्वारे होणारे उत्पन्न आणि उसासाठी रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) पेक्षा जास्त रक्कम निश्‍चित करण्याबाबत राज्य सरकारने पाच सदसीय समिती नियुक्त केली होती.

या समितीबरोबर सातत्याने कारखानदार व राज्य शासनाच्या प्रतिनिधीसमवेत बैठक झाली. राज्य शासनाच्या वतीने सातत्याने उपपदार्थांवर अधिक नफा मिळत असल्याचे सांगत कारखान्यांनी उपपदार्थांचा वाटा शेतकऱ्यांना द्यावा, असे सांगण्यात आले. या सर्व वाटाघाटीनंतर राज्य शासनाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर मात्र शेतकरी संघटनांचे अजूनही समाधान झाले नसून संघटना आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत.

आम्ही गेल्या २२ दिवसांपासून कर्नाटकात १५० रुपये जादा दर देण्यासाठी आंदोलन करत आहोत. पण एफआरपीपेक्षा फक्त ५० रुपये जादा दर इथेनॉल विक्रीतून येणाऱ्या रकमेतून जाहीर केला आहे. हा आम्हाला मान्य नाही.
शांतकुमार कुरबुरू, कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघ अध्यक्ष.
कर्नाटक शासनाने इथेनॉलच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून ५० रुपये प्रति टन शेतकऱ्यांना द्यायची घोषणा केली असली तरी नेमक्या कोणत्या आधारे त्यांनी एफआरपीपेक्षा ही जास्त रक्कम दिली, हे पाहावे लागेल. ‘एफआरपी’ निश्‍चित करताना उपपदार्थांचाही दर गृहीत धरला जातो. यामुळे इथेनॉलसाठी केलेली वेगळ्या तरतुदीची घोषणा अंमलबजावणीत आणण्याचे आव्हान असेल.
प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

Monsoon 2024 : मॉन्सून १९ मे रोजी अंदमानात दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT