Vegetable Market Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Vegetable Rate : नगर जिल्ह्यात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar APMC) मागील आठवड्यात भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Rate) सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले. दर दिवसाला १३०० क्विंटलपर्यंत भाजीपाल्याची आवक (Vegetable Arrival) होती. टोमॅटो, कोबीला अधिक मागणी राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर येथील बाजार समितीत मागील आठवड्यात पावसामुळे मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत आवक कमी झाली होती. गेल्या आठवड्यात टोमॅटोची ११० क्विंटलपर्यंत आवक झाली. प्रती क्विंटलला ८०० ते १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

वांगीची ४० क्विंटलपर्यंत आवक २ हजार ते चार हजार, फ्लॉवरची ४५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते ६ हजार, कोबीची १६० क्विंटलपर्यंत आवक होऊन ६०० ते १४००, काकडीची ८० क्विंटलची आवक होऊन ६०० ते २२००, गवारची २० क्विंटलपर्यंत आवक होऊन ३५०० ते ७ हजार, घोसाळ्याची ६ क्विंटलपर्यंत आवक होऊन ३ हजार ते चार हजार, दोडक्याची आठ क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ ते ५ हजार, कारल्याची ३५ क्विंटलपर्यंत आवक होऊन साडेतीन ते चार हजार, भेंडीची ३५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते ४ हजार, वाल शेंगाची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ४५०० ते ६ हजारापर्यंत दर मिळाला. घेवड्याची पाच क्विटंलपर्यत आवक होऊन चार हजार ते आठ हजार, डिंगरची दोन क्विंटल पर्यत आवक होऊन चार हजार ते पाच हजार, बटाट्याची २२५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते २३००,

हिरव्या मिरचीची ६० क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते ४२००, भुईमूग शेंगाची सहा क्विंटलपर्यंत आवक होऊन तीन हजार, शेवग्याची ८० क्विंटलपर्यंत आवक होऊन ३ हजार ५ हजार ५००, शिमला मिरचीची २० क्विंटलपर्यंतची आवक होऊन ७०० ते १५००, वाटाण्याची तीन क्विंटलपर्यंत आवक होऊन पाच ते सात हजाराचा दर मिळाला असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. फळांत डाळिंबाची ६० क्विंटलपर्यंत अवाक होऊन सतरा हजारापर्यंत दर मिळाला. मोसंबीची ९० क्विंटलपर्यंत आवक होऊन चार हजारापर्यंत, पपईला ३ हजारापर्यंत, पेरूला साडेसहा हजारापर्यंत तर सिताफळाला ८ हजारापर्यंत दर मिळत आहे.

पावसामुळे पालेभाज्या महागल्या

नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यात मागील आठवड्यात सतत पाऊस सुरु होता. त्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली. कोथिंबिरीच्या तीन हजार जुड्या, पालकच्या पाचशे ते सातशे जुड्या, शेपूच्या ७०० पर्यंत जुड्याची दररोज आवक होत होती. आवक कमी असल्याने पालेभाज्या मात्र महागल्या. ठोक बाजारात वीस रुपयांपर्यंत तर किरकोळ बाजारात चाळीस रुपयांपर्यंत कोथिंबिरीला दर मिळाल्याचे सांगण्यात आले. करडी, चुका भाजीची आवक अत्यंत अल्प होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT