Ginger Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Rate : आल्याच्या दरात सुधारणा

Ginger Seed : बियाणे खरेदीच्या तोंडावर आले पिकाच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे.

विकास जाधव 

Satara News : बियाणे खरेदीच्या तोंडावर आले पिकाच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. सध्या आल्यास प्रतिगाडी (५०० किलो) ३८ ते ४१ हजार रुपये दर मिळू लागला आहे. यामुळे नवीन लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे दर वाढणार असल्याने लागवडीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. बियाण्याचे दर व पाणी स्थितीवर आले लागवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यात आले पीक घेणारा सातारा प्रमुख जिल्हा असून सरासरी तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रावर आले पिकाची लागवड होते. आगामी आले लागवडीच्या दृष्टीने निरोगी व दर्जेदार बियाण्यांचा शोध सुरू झाला आहे. आले पीक टिकण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी निरोगी बियाणे आवश्यक असते. मार्चच्या अखेरीपर्यंत बियाणे खरेद सुरू राहणार आहे.

त्यादृष्टीने सध्या शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बियाण्याच्या खरेदीच्या तोंडावर आल्याच्या दरात सुधारणा होत आहे. सध्या धुणीच्या आल्यास प्रतिगाडीस (५०० किलो) ३८ ते ४१ हजार रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. हा दर मागच्या पंधरवड्यात ३५ ते ३६ हजार रुपये प्रतिगाडी मिळाला होता.

मागील सप्ताहापासून दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. पंधरावड्यात एका गाडीमागे पाच हजार रुपयांनी दर सुधारले आहेत. पुढील काळात दर वाढतील या अंदाजावर आले काढणी शेतकऱ्यांनी कमी केली आहे. यांचा परिणाम दरावर होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. लग्नसराई तसेच रमजान महिना आल्याने दर आणखी सुधारतील असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बियाणे खरेदीवर परिणाम होणार

बियाण्यांचे दर ३८ ते ४० हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र सध्या धुणीच्या आल्याचे दर सुधारल्याने बियाण्यांचे दर त्या पटीत वाढणार आहेत. धुणीच्या दरापेक्षी किमान चार ते पाच हजार रुपये जास्त दर बियाण्यांचा राहतो.

धुणीच्या आल्याच्या दरात वाढ होत असल्याने बियाणे काढणीसाठी शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. बियाण्याचे दर प्रतिगाडी ४५ ते ४८ हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. यामुळे बियाणे मिळणार नाही, मिळाले तर जास्त दराने घ्यावे लागणार तसेच पाणी स्थिती ही सर्व परिस्थिती बघता आले पिकाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT