Team Agrowon
आलं उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी केवळ थेट वापरावर अवलंबून चालणार नाही. तर आल्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे.
देशात आणि राज्यात प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाली नाही, त्यामुळं आल्याचा वापरही मर्यादीत राहिला. याचा फटका आले उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय.
आले पिकात औषधी गुणधर्म असल्याने औषधांसाठी वापर केला जातो. मात्र असा वापर मर्यादीत आहे. आल्यापासून आले पावडर, तेल, कॅंडी, बिअर, पेस्ट आदी प्रकारच्या पदार्थांचं उत्पादन होऊ शकतं.
नेहमीच्या जेवणात आल्याचा सर्रास वापर केला जातोच. याशिवाय आल्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात.
आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आले लसूण पेस्ट, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. यामुळे आल्याला बहुगुणकारी आणि बहुउपयोगी म्हणतात.
उत्तम प्रतिची पांढरी व आकर्षक सुंठ तयार करण्यासाठी गंधकाची धुरी दिली जाते. याशिवाय आल्यापासून बनवलेल्या कॅन्डीलाही चांगली मागणी आहे.