Soybean Market
Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनमधील मंदी किती दिवस टिकेल?

Anil Jadhao 

पुणे : देशातील बाजारात सध्या सोयाबीन भाव (Soybean Rate) नरमले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची निराशा झाली. सध्या सोयाबीनला ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

सोयाबीन (Soybean) दर दबावात येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. मात्र सोयाबीनमधील ही मंदी जास्त दिवस टिकणार नाही, सोयाबीनचे दर (Soybean bajarbhav) पुन्हा वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील सोयाबीन बाजारात मागील चार महिन्यांमध्ये मोठे खाच खळगे आले. ऑक्टोबरमध्ये सोयाबीन बाजार निचांकी पातळीवर होता.

नोव्हेंबर महिन्यात सोयाबीननं ६ हजारांचा टप्पा गाठला. मात्र डिसेंबरमध्ये दरपातळी कमी झाली. सरासरी दर ५ हजार ५०० रुपयांवर पोचला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दरानं २०० रुपयांची उभारी घेतली. पण ती जास्त दिवस टिकली नाही.

आता दर पुन्हा कमी झाले. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन दुष्काळामुळं घटण्याचा अंदाज आला. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढले. याचा देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळेल असं वाटत होतं.

पण तसं झालं नाही. अर्जेंटीनात उत्पादन घटेल पण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढीचा अंदाज आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे चढ उतार होत आहेत. परिणामी देशातील बाजाराला आधार मिळाला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयापेंडच्या दरात चढ उतार आहेत. मात्र दरपातळी वाढली. त्यामुळं भारतीय सोयापेंडलाही उठाव मिळतोय. निर्यातही चांगली सुरु आहे.

यंदा गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट निर्यात होईल, असा अंदाज आहे. पण सोयापेंड निर्यातीसाठी किती सौदे झाले? अर्जेंटीनातून किती सोयापेंड जागतिक बाजारात येईल? ब्राझीलचं उत्पादन कसं राहतं? याकडं बाजाराचं लक्ष आहे.

त्याची स्पष्टता पुढील काही दिवसांमध्ये येईल. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढूनही देशात स्थिर असल्याचं सांगितलं जातं.

खाद्यतेलाकडून आधार नाही

केंद्र सरकारनं खाद्यतेल आयात वाढविण्यासाठी शुल्क कमी केलं. तसंच सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीस परवानगी दिली होती. काही दिवसांपूर्वी सरकारनं सोयाबीन तेलावर आयात शुल्क लागू केलं.

पण तोपर्यंत पामतेल आणि सोयातेलाची आयात वाढली होती. सध्या देशात तेलाचा चांगला साठा आहे. पण अपेक्षेपेक्षा कमी उठाव आहे. बाजारात कापसाची आवक वाढल्यानं सरकी तेलाचं उत्पादन वाढलं. या सगळ्याचा सोयाबीन तेल आणि पर्यायानं सोयाबीन दरावर दबाव असल्याचं उद्योगाच्या वतीनं सांगण्यात आलं.

वायदेबंदीचाही फटका

वायदेबंदीमुळं बाजाराला आधार मिळत नाहीये. वायद्यांवर आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम तुलनेत लगेच जाणवतो. त्यामुळं प्रत्यक्ष खरेदी दरातही चढ उतार होत असतात.

पण देशातील वायदे बंद असल्यानं बाजार थेट खेरदीदारांच्या हाती गेला. बाजारात मर्यादीत आवक असूनही दर अपेक्षित पातळीवर नाहीत. वायदे सुरु झाल्यास दरात ३०० रुपयांपर्यंतची वाढ दिसू शकते, असं वायदे बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

दरवाढीचा अंदाज कायम

अनेक घटकांमुळं सध्या सोयाबीन बाजारावर दबाव आहे. मात्र पुढील काही दिवसांमध्ये दर वाढू शकतात. शेतकऱ्यांना ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दर मिळू शकतो.

तरी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्पानं सोयाबीन विकल्यास फायदेशीर ठरेल, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT