Kabuli Chana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kabuli Chana Market: खानदेशात मोठा काबुली हरभऱ्याची जोरदार आवक, दर ९६०० रुपये क्विंटल!

Market Update: खानदेशातील बाजारपेठेत मोठा काबुली (डॉलर) हरभऱ्याची आवक वाढली असून, दरात घट झाली आहे. मागील काही दिवसांत दर १०,४०० वरून ९,६०० प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार या भागातून मोठ्या प्रमाणात खरेदी करत असून, बाजारातील स्थिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशातील बाजारांत मोठा काबुली (डॉलर) हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. आवक मागील पाच ते सहा दिवसांत वाढली असून, दर ९२०० ते ९८०० रुपये प्रति क्विंटल व सरासरी ९६०० रुपये प्रति क्विंटल, असे मिळाले आहेत. सध्या रोज ८०० ते ९०० क्विंटल एवढी मो्ठ्या काबुली हरभऱ्याची आवक खानदेशात होत आहे.

मोठा काबुली हरभरा खानदेशात डॉलर किंवा मॅक्सिकन या नावाने बाजारात ओळखला जातो. त्याचा आकार अन्य हरभऱ्यांपेक्षा मोठा व रंग फिकट पांढरा किवा बासुंदी रंगाचा असतो. त्याचे दर अन्य सर्व हरभऱ्याच्या तुलनेत अधिक असतात. मोठा काबुली हरभऱ्याची लागवड खानदेशात बागायती पट्टा किंवा तापी, अनेर, गिरणा नदीच्या क्षेत्रात अधिक असते. ही लागवड काढणी पूर्ण झालेली कांदेबाग केळी, कापसाखाली रिकामे झालेले क्षेत्र व अन्य क्षेत्रांत शेतकरी करतात.

त्यास सिंचनासाठी अन्य हरभऱ्यापेक्षा अधिकचे पाणी लागते. मोठा काबुलीची लागवड खानदेशात जळगावातील चोपडा, रावेर, यावल, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात अधिक आहे. ही लागवड यंदा खानदेशात सुमारे २२ हजार हेक्टरवर झाली होती. लागवड नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये झाली. या पिकात मळणी मागील आठवड्यातच सुरू झाली असून, बाजारातील आवकही गती घेत आहे.

मोठा काबुलीसाठी खानदेशात चोपडा, शिरपूर, अमळनेर येथील बाजार प्रसिद्ध आहेत. गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार त्याची थेट खरेदीदेखील शिरपूर, चोपडा भागांतून करतात. त्याचे दर सुरुवातीला किंवा या महिन्याच्या मध्यात १० हजार ३०० ते १० हजार ४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.

परंतु आवक वाढल्यानंतर दर कमी झाले आहेत. सध्या दर ९२०० ते ९८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. चोपडा व शिरपूर येथील बाजारात सर्वाधिक आवक होत आहे. चोपडा येथे सध्या रोज ४०० ते ४२५ क्विंटल एवढी आवक मोठा काबुली हरभऱ्याची होत आहे. लागलीच लिलाव व चुकारे किंवा पैसे शेतकऱ्यांना दिले जात असल्याने चोपडा व शिरपुरात शेतकरी त्याची विक्री करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT