Hapus Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Season : अंतिम टप्प्यातही हापूसला प्रतिडझन ४५० रुपये दर

Mango Market : हापूस हंगाम अंतिम टप्प्यात असून स्थानिक बाजारपेठेतील आवक कमी झाली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यात हापूस हंगाम अंतिम टप्प्यात असून स्थानिक बाजारपेठेतील आवक कमी झाली आहे. त्यामुळे सध्या हापूसला प्रतिडझन ४५० रुपये दर मिळत आहे. कॅनिंगच्या दरात प्रतिकिलो ४२ वरून ३५ रुपयांपर्यंत घट झाली आहे.

जिल्ह्यात या वर्षी हापूस आंब्याचे दर चांगले राहिले. मार्चपासून स्थानिक बाजारपेठेमध्ये हापूस दाखल झाला. त्या वेळी प्रतिडझन ८०० ते १२०० रुपयांपर्यंत दर होता. मार्चमध्ये अपेक्षित आंबा उत्पादन आले नाही. परंतु एप्रिलपासून आंब्यांची आवक वाढली. परंतु त्याच वेळी विविध शहरांमध्ये मागणी वाढली.

स्थानिक बाजारपेठेमध्ये पर्यटकांचा ओढा वाढू लागला. त्यामुळे दर कायम स्थिर राहिले. मे महिन्यात आंब्यांच्या दरात किरकोळ बदल झाले. किनारपट्टी भाग वगळून इतर भागांतील आंबा देखील बाजारपेठेत आल्यामुळे हापूसच्या दरात किरकोळ घसरण झाली. परंतु तरीही बाजारपेठेत प्रतिडझन ५०० ते १००० रुपये दर राहिला. आता आंबा हंगाम अंतिंम टप्प्यात आहे.

त्यातच पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम मॉन्सूनपूर्व पावसामुळे संपुष्टात आला आहे. त्यामुळे हापूसला चांगला दर मिळत आहे. प्रतिडझन ४५० ते ५०० रुपये दर मिळत आहे. मात्र कॅनिंगच्या आंब्याच्या दरात मात्र प्रतिकिलो ७ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे कॅनिंगकरिता विक्री करणाऱ्या बागायतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

चार-पाच टप्प्यांत हंगाम

जिल्ह्यात पश्‍चिम आणि पूर्व अशा प्रमुख दोन टप्प्यात आंबा हंगाम येतो. किनारपट्टीच्या तालुक्यात जानेवारी, फेब्रुवारीपासून आंबा हंगाम सुरू होऊन तो मे अखेरपर्यंत चालतो. समुद्रकिनाऱ्याच्या भागात सुरवातीला आंबा परिपक्व होतो.

त्यानंतर किनारपट्टीपासून अंतर लांबत जाते, तसा आंबा हंगाम पुढे सरकत जातो. त्यामुळे चार- पाच टप्प्यांत आंबा हंगाम चालतो. पूर्वपट्ट्यात मात्र एप्रिलअखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात आंबा हंगाम सुरू होतो.

या वर्षीचा आंबा हंगाम आता संपत आला आहे. या वर्षी उत्पादन कमी होते. परंतु आंब्याला दर चांगला मिळाला आणि दर टिकून देखील राहिला. कॅनिंगच्या आंब्याला देखील सुरुवातीला चांगला होता. अलीकडे पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे.
- सुशांत नाईक, आंबा बागायतदार, वेंगुर्ला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tamil Nadu Government: तामिळनाडूतील गरिब कुटुंबांना वर्षाला ३ एलपीजी सिलिंडर मोफत; महिलांसाठी मोफत बससेवा

Silk Cocoon Market: महाराष्ट्रातील रेशीम कोष बाजाराची वस्तुस्थिती अन् उत्पादकांच्या व्यथा

China Agriculture Crisis: चीनमध्ये शेतीला ‘एल निनो’चा फटका

Solar Power Projects: सौर ऊर्जा प्रकल्प : स्थिर उत्पन्नाचे साधन

Future of Farming: शेतीत उभे राहतील नवे व्यवसाय मॉडेल्स

SCROLL FOR NEXT