Onion  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Export : मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय... गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होणार; महाराष्ट्राच्या लाल कांद्यावर निर्यातबंदी कायम

Onion Market : केंद्र सरकारने गुजरातमधून २ हजार टनांपर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. ही निर्यात देशातील तीन बंदरांवरून होणार आहे. निर्यात करताना गुजरातच्या फलोत्पादन विभागाची मंजुरीही बंधनकारक करण्यात आली आहे.

Anil Jadhao 

Pune News : केंद्र सरकारने गुजरातमधून २ हजार टनांपर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. ही निर्यात देशातील तीन बंदरांवरून होणार आहे. निर्यात करताना गुजरातच्या फलोत्पादन विभागाची मंजुरीही बंधनकारक करण्यात आली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंबंधीची अधिसूचना गुरुवारी (ता.२५) काढली आहे. 

विदेश व्यापार महासंचलनालयाने आपल्या अधिसूनचनेत म्हटले आहे की, पांढऱ्या कांद्याची एकत्रित निर्यात २ हजार टनांपेक्षा जास्त नसावी. तसेच ही निर्यात तत्काळ सुरु होईल आणि ठरलेल्या बंदरांवरूनच होणार आहे. पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी मुंद्रा बंदर, पिपावाव बंदळ आणि नाव्हा शेवा किंवा जेएनपीटी बंदरावरून परवानगी देण्यात आली. म्हणजेच ही बंदर वगळता इतर बंदरांवरून निर्यात होणार नाही. 

तसेच पांढऱ्या कांद्याची निर्यात करताना गुजरातच्या फलोत्पादन विभागाचीही मंजुरी घ्यावी लागणार आहे. म्हणजेच गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांचे पत्र निर्यातीसाठी बंधनकारक असेल. सरकारने अधिसूचनेत पांढऱ्या कांद्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यात लाल कांदा नाही. 

सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांदा निर्यातबंदी केली होती. तेव्हापासून कांद्याला खूपच कमी भाव मिळत आहे. शेतकरी आणि व्यापारी तसेच निर्यातदार कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी करत आहेत. पण सरकारने केवळ मर्यादीत स्वरुपात निर्यातीला परवानगी दिली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT