Groundnut Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Groundnut Rate : हिंगोलीत भुईमूग शेंगा ६९०० ते ७७०५ रुपये

Oilseed Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ११) भुईमूग शेंगांची सुमारे ३०० क्विंटल आवक होती.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ११) भुईमूग शेंगांची सुमारे ३०० क्विंटल आवक होती. भुईमूग शेंगांना (सुकी) प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७७०५ रुपये तर सरासरी ७३०२ दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ११) भुईमूग शेंगांची सुमारे ३०० क्विंटल आवक होती. भुईमूग शेंगांना (सुकी) प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७७०५ रुपये तर सरासरी ७३०२ दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत येलदरी-सिद्धेश्वर धरणाच्या लाभक्षेत्रात यंदाच्या उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या हिंगोली, परभणी जिल्ह्यातील भागातून तसेच अन्य ठिकाणांहून भुईमूग शेंगांची आवक होत आहे. एक दिवसाआड आवक घेतली जात आहे.

गेल्या महिनाभरापासून भुईमूग शेंगांच्या दरात किंचित चढउतार होत आहे. दर सरासरी सात हजारांच्या आसपास आहेत. मंगळवारी (ता. ११) भुईमूग शेंगांच्या कमाल दरात थोडी सुधारणा झाली. शनिवारी (ता. ८) भुईमूग शेंगांची २३५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६६९९ ते कमाल ७३३५ रुपये तर सरासरी ७०१७ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ६) भुईंमूग शेंगांची १५५ क्विंटल आवक असताना प्रतक्विंटल किमान ६६०० ते कमाल ७२८० रुपये तर सरासरी ६९४० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ४) भुईमूग शेंगांची ४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६३०० ते कमाल ७०६५ रुपये तर सरासरी ६६८२ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT