Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : सरकारी तूर खरेदीसाठी १७ केंद्र सुरू करण्याच्या हालचाली

Tur Market : सोयाबीन, कापसानंतर तुरीचे दरही घसरले आहे. यामुळे ‘नाफेड’च्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Yavatmal News : सोयाबीन, कापसानंतर तुरीचे दरही घसरले आहे. यामुळे ‘नाफेड’च्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यासाठी ‘नाफेड’ने नियोजन सुरू केले आहे. को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने यंदा दोन केंद्र वाढविण्याचा प्रस्ताव दिला असून, विदर्भ मार्केटिंगकडूनही सात केंद्र सुरू करण्याच्या हालचाली आहे.

सद्यःस्थितीत तुरीला ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीन तसेच कापसाचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी ‘नाफेड’ आणि ‘सीसीआय’ या केंद्रांवर शेतीमाल विकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुरीच्या दरातही घरसण सुरू आहे.

खासगी बाजारातील स्थिती पाहता दरात फारशी सुधारणा होण्याची शक्यता नाही. यामुळे आतापासून शासकीय खरेदी केंद्राची तयारी ‘नाफेड’ने सुरू केली आहे. शेतकऱ्यांचा माल लक्षात घेता यंदा १७ केंद्र राहण्याची शक्यता आहे. यात मार्केटिंग फेडरशनची १० केंद्रे असणार आहे.

महागाव, पांढरकवडा, दिग्रस, आर्णी, पुसद, पाटण, दारव्हा, बाभूळगाव या केंद्रासह नेर तसेच मारेगाव या ठिकाणीही केंद्राचा प्रस्ताव आहे. याशिवाय उर्वरित तालुक्यात विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तूर खरेदी करणार आहे.

सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यात सोयाबीन खरेदीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सात जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत होती. शेतकऱ्यांच्या घरी असलेला शेतीमाल तसेच शेतकऱ्यांची मागणी पाहता ६ फेब्रवारीपर्यंत सोयाबीन केंद्र सुरू असणार आहे.

आतापर्यंत मार्केटिंग फेडरेशनने १ लाख ७४ हजार ९५३ तर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने २ लाख २१ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. आणखी जवळपास ५० हजार क्विंटल सोयाबीनची होणे अपेक्षित आहे.

त्यादृष्टीनेही ‘नाफेड’ने तयारी करून ठेवली आहे. मार्केटिंग फेडरेशन महागाव, पांढरकवडा, पाटण, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभूळगाव, दारव्हा या केंद्रावर खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT