Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement: आता तुरीचीही शासकीय खरेदी

Tur Market: आता तुरीची शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ झाला असून, २२ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: आता तुरीची शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ झाला असून, २२ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली आहे. अद्याप खरेदी केव्हा प्रारंभ होईल, हे स्पष्ट नसले तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्राने २.९७ लाख टन खरेदीचे लक्ष्यांक दिले आहे.

केंद्राने २०२४-२५ साठी तुरीला ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीदर जाहीर केला आहे. या हंगामातील तूर बाजारात आली असून, खुल्या बाजारात सरासरी ७ हजार १२५ रुपये दर मिळू लागला आहे. प्रतिक्विंटल नुकसान होऊ लागल्याने सोयाबीनप्रमाणे तुरीच्या शासकीय खरेदीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.

त्यानुसार पणन विभागाने केंद्राला शासकीय खरेदीची परवानगी मागितली. त्यास केंद्राने मंजुरी दिली असून २.९७ लाख मेट्रिक टन खरेदीचे लक्षांक दिले आहे. शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असून ३ ते २२ फेब्रुवारी या मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

तुरीची शासकीय खरेदी नाफेडमार्फत करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगची वीस केंद्रे आहेत. तथापि, खरेदी-विक्री संघांना पणन विभागाचे पत्र आले असले तरी जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगला अद्याप सूचना मिळालेल्या नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शासकीय खरेदीचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती सहकारी खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष पंकज देशमुख व व्यवस्थापक संजय इंगळे यांनी केले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

अद्ययावत सातबारा, २०२४-२५ चा ऑनलाइन पीकपेरा, आधार कार्डची सत्यप्रत, बॅंक पासबुकच्या आयएफएससीसह सत्यप्रत व नोंदणी अर्ज.

...अशी करा नोंदणी

शेतकऱ्यांना वैयक्तिक मोबाइलवरून देखील नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे सेतूकेंद्र व खरेदी-विक्री संस्थांच्या कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी मोबाइलजवळ असणे आवश्यक आहे. नोंदणी करताना त्यावर ओटीपी जाणार असून, तो नोंद केल्याशिवाय नोंदणी होणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT